शिक्षकांच्या समस्या सोडवण्यावर भर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

रत्नागिरी - गेल्या ३६ वर्षांपासून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचाच आमदार कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडून आला आहे. नवनवीन कायदे, अध्यादेश यामुळे शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रश्‍न उभे राहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शिक्षक परिषद नक्कीच समस्या सोडवेल, असे परिषदेचे अधिकृत उमेदवार वेणूनाथ कडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष आनंद शेलार, पंकज पाटील, रामचंद्र कुवार, अनंत सुवार आदी उपस्थित होते. पुढील महिन्यात कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विद्यमान आमदार रामनाथ मोते हेसुद्धा परिषदेमधून निवडून आले; परंतु तेसुद्धा या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत; परंतु कडू हे परिषदेचे अधिकृत उमेदवार आहेत, असे राज्य उपाध्यक्ष रवींद्र इनामदार यांनी सांगितले.श्री. कडू यांनी सांगितले की, कोकणात सर्व जिल्ह्यात परिषदेचे चांगले काम आहे. सुमारे ११ हजारांहून अधिक सभासद परिषदेकडे आहेत. प्रत्येक शाळेमध्ये संघटनेचा सदस्य असून संघटनेच्या शिस्तीमध्ये काम करणारे आहेत. शिक्षकांसमोर नव्या अडचणी येत आहेत. अशैक्षणिक कामे लादल्याने शिकवण्याचा वेळ कमी पडतो. मातृभाषा व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान मिळाले पाहिजे. आकृतिबंध, पोषण आहाराची जबाबदारी, बदल्या, समायोजन, रिक्त पदे अशा अनेक समस्या आहेत. मोते यांच्यासंदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, २०१० मध्ये मला तिकीट मिळणार होते; पण ते कडू यांना दिले. विधानसभेत आवाज उठविण्याची जबाबदारी परिषदेने त्यांच्यावर दिली होती. 

Web Title: To resolve the problem throughout the teachers