दुपारी एक वाजेपर्यंत निकालाचे चित्र 

दुपारी एक वाजेपर्यंत निकालाचे चित्र 

अलिबाग - रायगड जिल्हा परिषद व जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांची मतमोजणी गुरुवारी (ता.२३) प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत संपूर्ण निकालाचे चित्र स्पष्ट होणे अपेक्षित आहे.  

जिल्हा परिषद गट व त्याअंतर्गत पंचायत येणाऱ्या पंचायत समिती गणांची एकाच वेळी मतमोजणी करण्यात येईल. जिल्हा प्रशासनाने मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली आहे. 

जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १८७; तर पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी ३५७ उमेदवार नशीब अजमावत आहेत. जिल्ह्यात मंगळवारी (ता.२१) ७०.९७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

पंधरा तालुक्‍यांच्या ठिकाणी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. जिल्हा परिषद गट व त्याअंतर्गत येणारे दोन गट यांची एकाच वेळी मतमोजणी केली जाणार आहे. प्रत्येक टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, मतदान यंत्र हाताळण्यासाठी एक मास्टर ट्रेनर कर्मचारी कार्यरत असेल. मतमोजणीच्या ठिकाणी लेखाधिकाऱ्यांचे पथक राहणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणी होईल. 

मतमोजणीच्या ठिकाणी मतदान यंत्रे कडक बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. मतमोजणीच्या दिवशी केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्र; तसेच परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रात केवळ उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे. मतमोजणी केंद्रापासून १०० मीटर अंतराच्या आत कार्यकर्त्यांना प्रवेशास मनाई असेल.

तालुकानिहाय मतमोजणीचे ठिकाण
 अलिबाग- को.ए.सो. जनरल अरुणकुमार वैद्य विद्यालय.
 मुरूड- दरबार हॉल.
 पेण- को.ए.सो. लिटिल एंजल स्कूल.
 पनवेल- व्ही. के. हायस्कूल, जुने पनवेल.
 उरण- सिडको ट्रेनिंग सेंटर, फुंडे.
 कर्जत- श्री साईकृपा शेळके बंधू मंगल कार्यालय, किरवली.
 खालापूर- पंचायत समिती कार्यालय.
 माणगाव- मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सभागृह, माणगाव.
 रोहा- रोहा नगरपालिकेचे ज्येष्ठ नागरिक सभागृह.
 तळा- पंचायत समिती, डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी सभागृह.
 सुधागड- तहसील कार्यालय.
 महाड- डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, बहुउद्देशीय सभागृह.
 पोलादपूर- सार्वजनिक बांधकाम विभाग, उपअभियंता जुने कार्यालय.
 म्हसळा- न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज.
 श्रीवर्धन- मध्यवर्ती प्रशासकीय भवन सभागृह.

जेवढी केंद्रे, तेवढ्या फेऱ्या 
प्रत्येक मतदानसंघात जेवढी मतदान केंद्रे होती, तेवढ्या मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत. गट व गणाची एकाच वेळी मतमोजणी केली जाणार असल्याने गणांचे निकाल लवकर जाहीर होणार आहेत. गटाच्या निकालाला थोडा उशीर लागणार आहे. टपाली मतांची मतमोजणी करण्यासाठी स्वतंत्र पथक कार्यरत असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com