क्रॉस व्होटिंगने निकाल बदलले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

रत्नागिरी - पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतांमध्ये जातीय समीकरणे वरचढ ठरल्याचे दिसते. भाजप, कॉंग्रेस आघाडीला झालेल्या एकूण मतांमध्ये आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला झालेल्या मतांमध्ये मोठी तफावत आहे. भाजप उमेदवाराबाबतच्या नाराजीमुळे क्रॉस व्होटिंग झाल्याचे स्पष्ट दिसते. त्याचा फायदा शिवसेनेचे उमेदवार राहुल पंडित यांना झाला. सेनेतदेखील पॅनेल टू पॅनेल मतदान झाल्याचा दावा कितपत खरा हा मात्र संशोधनाचा विषय आहे.

पालिका निवडणुकीचा निकाल भाजपला विचार करायला लावणारा आहे. भाजपची काही प्रभागांमध्ये हक्काची मते आहेत. ही एकगट्ठा मते काही झाले तरी पक्षाच्या बाजूने राहतात. भाजपचे प्रभाग 9, 14 आदी ठिकाणी जे उमेदवार निवडून आले त्याचे इंगित यात आहे; मात्र त्यातूनच पसंतीच्या उमेदवाराला क्रॉस व्होटिंग झाल्याचे स्पष्ट दिसते. भाजपच्या 30 जागा लढविणाऱ्या उमेदवारांना एकूण 9 हजार 600 च्या दरम्यान मते मिळाली आहेत; मात्र त्याचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार महेंद्र मयेकर यांना 6 हजार 799 एवढीच मते पडली. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची स्वप्न पाहणारा भाजप पक्ष तिसऱ्या क्रमांकावर गेला.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने जागावाटप करून आघाडी म्हणून ही निवडणूक लढवली. कॉंग्रेससाठी 6 जागा सोडून राष्ट्रवादीने 24 जागांवर निवडणूक लढवली. आघाडीच्या उमेदवारांची एकूण मते 8 हजार 150 एवढी आहेत. नगराध्यक्षपदाचे उमेदवार उमेश शेट्ये यांना 10 हजार 966 मते मिळाली आहेत. येथेदेखील आघाडीच्या उमेदवारांना नाकारले असले, तरी नगराध्यक्षपदाचे उमेदवार शेट्ये यांना मतदारांनी पसंती दिली आहे.

शिवसेनेला मिळालेली एकूण मते आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार राहुल पंडित यांच्या मतांमध्ये फारसा फरक नाही. सेनेला एकूण 14 हजार 450 मते आहेत. राहुल पंडित यांना पडलेली मते 14 हजार 693 आहेत. त्यामुळे सुमारे अडीचशे मतांचा त्यामध्ये फरक आहे. भाजपच्या मतदारांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला साफ नाकारल्याचे यावरून दिसते. त्यांची सुमारे 3 हजार मते फिरली आहेत. राष्ट्रवादीच्या श्री. शेट्ये यांना मिळालेल्या मतांचाही त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे जातीय राजकारण आणि पसंतीच्या उमेदवारांमुळे सेनेचे राहुल पंडित यांच्या पारड्यात ही मते पडल्याचे मानले जाते.

Web Title: Results changed because of Cross Voting