सुधागड तालुक्याचा बारावीचा निकाल ८१.७३ टक्के ; जय खंडागळे विज्ञान शाखेत प्रथम

jay khandagale.jpg
jay khandagale.jpg

पाली : सुधागड तालुक्यात ग.बा.वडेर हायस्कूल व वसंत गणेशमल ओसवाल कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर बाराविच्या परिक्षा संपन्न झाल्या. या परीक्षेसाठी तालुक्यातील पाच कनिष्ठ महाविद्यालयातील ७७० विद्याथ्यांपैकी ७६१ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. यात ६२२ विद्यार्थी उतीर्ण झाले असून तालुक्याचा बारावीचा निकाल ८१.७३ टक्के लागला आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरविलेल्या पालीतील जय खंडागळे हा प्रतिकुल परिस्थितीवर मात करत विज्ञान शाखेत प्रथम अाला. त्याला ८०.७६ टक्के गूण मिळाले अाहेत.

तालुक्यात ग.बा.वडेर हायस्कूल व वसंत गणेशमल ओसवाल कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत प्रथम आले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत ओसवाल व प्राचार्य अजय पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

  • ग.बा.वडेर हायस्कूल व वसंत गणेशमल ओसवाल कनिष्ठ महाविद्यालय, पाली

विज्ञान शाखेत १८६ विद्यार्थ्यांपैकी १७९ विद्यार्थी उतीर्ण झाले असून यात ५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. या विज्ञान शाखेचा निकाल ९६.२३ टक्के लागला आहे. यात प्रथम क्रमांक जय खंडागळे ८०.७६ टक्के, द्वितीय क्रमांक स्नेहा वेंगुर्लेकर ८०.६१ टक्के तर तृतीय क्रमांक श्रेयस मनवर यास ७८.९२ टक्के गुण मिळाले आहेत. कला शाखेत ११५ विद्यार्थ्यांपैकी ७४ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल ६४.३४ टक्के लागला आहे. यात प्रथम क्रमांक प्रदीप भला ७७.५३ टक्के, द्वितीय क्रमांक अनिकेत हिलम ७२.६१ टक्के तर तृतीय क्रमांक अरुण पारधी यास ६६.६१ टक्के गुण मिळाले आहेत. तर वाणिज्य शाखेत २४४ विद्यार्थ्यांपैकी २२१ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. या कला शाखेचा निकाल ९०.५७ टक्के लागला आहे यात प्रथम क्रमांक नरेश भुरे – ७६.६१ टक्के, द्वितीय क्रमांक दिव्या शेडगे – ७३.८४ टक्के तर तृतीय क्रमांक राज भोसले यास ७०.४६ टक्के गुण मिळाले आहेत.

  • आत्मोन्नती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, जांभूळपाडा  

कला शाखेत ५६ विद्यार्थ्यांपैकी ४४ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. शाळेचा निकाल ७८.५७ टक्के लागला आहे.

  • श्री बल्लाळ विनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालय, पाली

कला शाखेत ३५ विद्यार्थ्यांपैकी १६ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल ४५.७१ टक्के लागला आहे. यात प्रथम क्रमांक निलेश फसाले ५२.३० टक्के, द्वितीय क्रमांक सचिन माडे ५१.३८ टक्के तर तृतीय क्रमांक सिद्धेश पाटील यास ४८.७६ टक्के गुण मिळाले आहेत. वाणिज्य शाखेत ३८ विद्यार्थ्यांपैकी २६ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल ६८.४२ टक्के लागला आहे. यात प्रथम क्रमांक प्रतिक वाघमारे ६८.६१ टक्के, द्वितीय क्रमांक सत्यवान कोंडे ६२.६१ टक्के तर तृतीय क्रमांक अजय डोके यास ५६.९२ टक्के गुण मिळाले आहेत.

  •  संत नामदेव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव 

कला शाखेत २५विद्यार्थ्यांपैकी १२ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. शाळेचा निकाल ४८ टक्के लागला आहे. यात प्रथम क्रमांक कल्याणी मोहिते ७५ टक्के, द्वितीय क्रमांक दामिनी कदम – ६७ टक्के तर तृतीय क्रमांक प्रणाली थोरवे हिला ६५ टक्के गुण मिळाले आहेत.

  • एकलव्य आदिवासी मंडळ प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय,वावळोली

व्होकेशनल शाखेत ६२ विद्यार्थ्यांपैकी ५० विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. शाळेचा निकाल ८०.६४ टक्के लागला आहे. यात प्रथम क्रमांक तुळशीराम उघडा ७१.३८ टक्के,द्वितीय क्रमांक दिप्ती तांडेल ८६.३७ टक्के तर तृतीय क्रमांक कोमल कुडकरकर हिला ६४.६१ टक्के गुण मिळाले आहेत

  • प्रतिकुल परिस्थितीवर मात करत जय खंडागळेचे सुयश

जयच्या लहाणपणीच त्याच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले. त्याची अाई सारिका यांनी पाळणाघर चालवून जयचे शिक्षण पुर्ण केले. अतिशय खडतर व प्रतिकुल परिस्थितीत जयने प्रचंड मेहनत व जिद्दिच्या जोरावर अापला अभ्यास सुरु ठेवला. येथील ग.बा. वडेर हायस्कुलमधून तो दहावीच्या परिक्षेत प्रथम अाला होता. अाणि अाता बारावीच्या परिक्षेत प्रथम अाला अाहे. त्यामुळे सर्वच स्तरांतून त्याचे कौतूक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com