निवृत्त न्यायाधीश भास्कर शेट्ये यांचे निधन

गेले काही महिने शेट्ये मुंबईत आपल्या मुलाकडे वास्तव्याला होते.
Bhaskar Shete
Bhaskar Shetesakal

रत्नागिरी : विधानसभेचे माजी निवृत्त प्रधान सचिव व निवृत्त न्यायाधीश भास्कर नारायण शेट्ये (वय ८९) यांचे आज मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. रत्नागिरीतील एक शिस्तप्रिय व्यक्तीमत्व हरपल्याबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला.

गेले काही महिने शेट्ये मुंबईत आपल्या मुलाकडे वास्तव्याला होते. तेथेच आज दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर तिथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Bhaskar Shete
हे काय स्वातंत्र्यासाठी केलेले आंदोलन नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

भास्कर शेट्ये यांचे शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरीत झाले. त्यानंतर त्यांनी वकिलीची पदवी घेतली. काही काळ वकिली केल्यानंतर पुढे न्यायाधीश म्हणून निवड झाली. या काळात त्यांनी सांगली, पुणे, नाशिक, राधानगरी, कोल्हापूर, धुळे, चाळीसगांव, पालघर, पणजी आदी ठिकाणी न्यायाधीश म्हणून अनेक वर्षे काम केले. त्यानंतर त्यांची निवड महाराष्ट्र विधानसभेचे प्रधान सचिव म्हणून झाली. या पदावर त्यांनी दहा वर्षे कामकाज पाहिले.

सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांची नव्यानेच निर्माण झालेल्या महाराष्ट्र- गोव्याचे बँकींग लोकपाल म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी तीन वर्षे काम पाहिले व निवृत्तीनंतर पुन्हा रत्नागिरीत वास्तव्यास आले. भास्करराव शेट्ये हे गगनगिरी महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांना महाराजांचा अनेक वर्षे जवळून सहवास लाभला होता.

Bhaskar Shete
सौदी अरेबियाच्या विमानतळावर पुन्हा ड्रोन हल्ला; 8 जखमी

भास्कर शेट्ये हे विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांमध्ये कार्यरत होते. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक सदस्य म्हणून ते अनेक वर्षे काम करीत होते. भास्कर शेट्ये यांना नाट्य अभिनायाची आवड होती. त्यांनी पटवर्धन हायस्कूल, गोगटे कॉलेज, मुंबईचे गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये शिक्षण चालू असताना नाटकांमध्ये भूमिका केल्या होत्या. त्यामुळे रत्नागिरीत काही वर्षांपूर्वी झालेल्या नाट्यसंमेलनाच्या सुकाणू समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. हे पद त्यांनी यशस्वीपणे सांभाळले. ते शिस्तप्रिय व वक्तशीर म्हणून प्रसिद्ध होते. मुंबईतील प्रसिद्ध लाड फाऊंडेशनच्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com