कणकवलीत दुचाकी अपघातात सेवानिवृत्त पशुधन अधिकारी ठार 

Retired Livestock Officer Killed In Two Wheeler Accident
Retired Livestock Officer Killed In Two Wheeler Accident

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ. नामदेव दत्ताराम पवार (वय 60, रा. कलमठ-बौद्धवाडी) यांचा मृत्यू झाला. हा अपघात येथील पोलिस स्टेशनलगतच्या कलमठ मच्छीमार्केटसमोर आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडला. 

अपघातानंतर जखमी अवस्थेत असलेल्या डॉ. पवार यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालय व तेथून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

नरडवे-पायरवाडी येथील मूळचे रहिवासी असलेले डॉ. पवार हे कलमठ-बौद्धवाडी येथे स्थायिक होते. शहरातून ते आपल्या यामाहा अल्फा स्कूटरवरून कलमठ येथील घरी निघाले होते. कलमठ मच्छीमार्केटजवळ पादचारी आडवा आल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. ते घसरून खाली कोसळले. यात त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी जखमी अवस्थेतील डॉ. पवार यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून अधिक उपचारासाठी त्यांना कणकवलीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

पुणे येथे पशुवैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या पशुसंवर्धन विभागात ते पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. पशुधन विकास अधिकारी म्हणून त्यांनी ग्रामीण भागात चांगली सेवा दिली होती. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणारा पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जात असे. त्यांच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर विविध क्षेत्रांतील मंडळींनी व नातेवाइकांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. अपघाताची खबर अंकुश नारायण पवार यांनी कणकवली पोलिसांत दिली. 

डॉ. पवार यांचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला. त्यांच्यावर नरडवे येथील स्मशानभूमीत उद्या (ता.6) सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सावंतवाडी एस. पी. के. कॉलेजचे कर्मचारी एम. डी. पवार व एसटीमधून सेवानिवृत्त झालेले जी. डी. पवार यांचे ते भाऊ होत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातू, दोन भाऊ असा परिवार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com