मेंढपाळाचे कळपांचा परतीचा प्रवास सुरु

लक्ष्मण डूबे
सोमवार, 21 मे 2018

रसायनी (रायगड) - रायगड आणि ठाणे जिल्ह्यात चाऱ्याच्या शोधात आलेले देशावरील मेंढपाळाचे कळप आता पावसाळा जवळ आल्याने परतीच्या प्रवासाला लागले आहे. बोरघाट नजीकच्या खालापुर तालुक्यात मेंढ्यांचे कळप गोळा होऊ लागले आहे. 

दुष्काळ सदृष्य परिस्थीती त्यामुळे चारा व पाणी टंचाई जाणवत आहे. दरवर्षी घाट माथ्यावरील ठिक-ठिकाणच्या जिल्हयातील मेंढपाळांचे कळप चाऱ्याच्या शोधात कोकणात येतात. दसरा झाल्यानंतर मेंढपाळ कळप घेऊन बोरघाट ऊतरून कोकणात येतात. मात्र यावर्षी देशावर चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे बहुतेक कळप सुमारे पंधरा वीस दिवस ऊशीरा म्हणजेच दिवाळी नंतर आले आहे. असे सांगण्यात आले. 

कोकणातील रायगड आणि ठाणा जिल्ह्यातील तालुक्यात कळपांना चरण्यासाठी घेऊन फिरावे लागते. ज्यांच्या शेतात कळप वस्तीला थांबतात त्या जमीन मालकाकडुन चारा किंवा पैसे मोबदला मिळतो असे भिमा मनवर, रा. जेजुरी याने सांगितले. पावसाळा जवळ आला की जुनमध्ये बोरघाट चढुन कळप गावाकडे निघतात. पाऊस आला की झटपट घाट चढुन जाता यावे त्यामुळे कळप खालापुर तालुक्यात आठ दहा किलोमीटर अंतराच्या आसपास थांबतात असे सांगण्यात आले. 

"यंदाच्या वर्षी जास्त गरमा आहे. त्यामुळे पाऊस लवकर येईल तसेच आधिक माहिना म्हणजेच धोंड्याचा महिना असल्याने काही कळप लवकर गावाकडे जातील असे भिमा मनवर याने सांगितले"

Web Title: The return trip of the shepherds' flock started