सुधागडमध्ये पुन्हा एकदा परतीच्या वादळी पावसाचे थैमान

pali
pali

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यात परतीच्या वादळी पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले. मंगळवारी (ता. 9) सायंकाळी वादळीवाऱ्यासह अालेल्या पावसामुळे पालीतील अनेक घर व इमारतींवरील पत्रे उडाले. तसेच झाप गावातील जि.प प्राथमिक शाळेचे पत्रे उडाले. यावेळी शाळा सुरु होती मात्र शिक्षक व विदयार्थ्यांच्या प्रसंगावधानतेमुळे कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

शाळेचे पत्रे उडाल्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र शाळेचे मोठे नुकसान झाले. अाज बुधवारी (ता. 10) जिल्हा परिषद शाळेला घटस्थापनेची सुट्टी असल्याने कोणता प्रश्न उद्भवला नाही. मात्र गुरुवारी (ता. 11) शाळा भरणार आहे त्यामूळे पत्रे बसवुन दुरुस्ती न केल्यास शाळा सुरु करणे अवघड होईल. पाली धुंडीविनायक नगरातील लक्ष्मण महाजन, अरुण प्रधान, संतोष वडके, गोळे सर, योगेश पाटील, वारगुडे कॉम्लॅक्स आदिंच्या घरे व इमारतींचे पत्रे उडाले तसेच काहि घरांच्या भितींना तडे देखिल गेले. काही ठिकाणी विजेचे खांब व झाडे देखिल कोसळली. परिणामी अनेक गावांमधील विज देखिल गेली होती.

महसुल विभागाने तातडीने घटनास्थळी पोहचून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पाली तलाठी दामोदर शिंदे, कोतवाल रोशन रुईकर, झाप पोलीस पाटील चंद्रगुप्त भालेराव आदिंनी ग्रामस्तांच्या उपस्थितीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले. वादळी पावसामुळे अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com