रयासनीत झालेल्या वादळी पावसामुळे भाताच्या पिकाचे नुकसान

लक्ष्मण डुबे 
रविवार, 30 सप्टेंबर 2018

वादळी पावसाने ज्या शेतक-यांचे भाताचे नुकसान झाले आहे. त्यांच्या पिकांचा पंचनाम करण्यात येऊन शासनानी नुकसान भरपाई द्यावी. या मागणीचा शासनाकडे पाठपुरवा करण्यात येणार आहे. 

- सुदाम कडपे, कृषिमित्र, मोहोपाडा, ता खालापूर 

रसायनी (रायगड) : रसायनी परिसरात दोन दिवसांपूर्वी विजेच्या कडकडात वादळी पाऊस झाला. या वादळी पावसाने खरीपाच्या हंगामातील कापणीला आलेल्या शेतक-यांचे भाताच्या पिकांचे काही ठिकाणी नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. तर मोहोपाडा परीसरात वीज पुरवठा एक तास खंडित झाला. 

परिसरातील बहुतेक शेतक-यांची भाताचे पिक निसावले आहे, तर काहीचे पिक कापणीला आले आहे. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास परिसरात विजेच्या कडकडात पुन्हा वादळी पाऊस झाला. या पावसात रसायनी परीसरातील काही ठिकाणी शेतक-यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी काळजीत पडले आहे. दरम्यान, सध्या हस्त नक्षत्रात वातावरणात प्रचंड उकडा आहे. त्यामुळे अजुन पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भितीने सर्वच शेतकरी धास्तावले आहे.

Web Title: Rice crop losses due to heavy rains