धो धो झाला मुसळधार पाऊस अन् कोकणातील गेली रोपे वाहून.... 

rice plant flowering rainfall Rice seedlings carried away in mandangad ratnagiri
rice plant flowering rainfall Rice seedlings carried away in mandangad ratnagiri

मंडणगड (रत्नागिरी) : मंडणगड तालुक्‍यात गुरुपौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. तालुक्‍यातील तीन केंद्रांतील मंडणगड 253 मि.मी., देव्हारे 280 मि.मी., म्हाप्रळ 150 मि.मी. अशी एकूण 683 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दिवसभरात सरासरी 227 मि.मी. पाऊस पडला आहे. लाटवण, तुळशी परिसरांत ओढ्यांना पूर आल्याने लावणीची भाताची रोपे वाहून गेली. काही शेतकऱ्यांनी वाहून जाताना पडवीत जमा केली. मुसळधार पाऊस झाल्याने शेत शिवारात पाणीच पाणी झाले. 

मंडणगडात पाऊस आला धावून, भात रोपे गेली वाहून ​


तालुक्‍यात दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिली. सध्या भात लावणीची कामे सुरू आहेत; मात्र सरींवर सरी आल्याने शेतकरी, बैल यांना चांगलेच झोडपून काढले. चिखलणी करताना प्रचंड पाण्याचा अडथळा निर्माण झाला. लाटवण-मधलीवाडी, तुळशी व तालुक्‍यातील अन्य पाणथळ भागांत पाणी वाढल्याने तरवा काढून बांधलेले भाताच्या रोपांचे मूठ पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. नुकतीच लावणी केलेली रोपेही पाण्यात तरंगू लागली. वाहून जाणारी रोपे जमा करताना शेतकऱ्यांची धावपळ उडाली. आंबडवे मार्गावर माहू-तुळशी-पालेदरम्यान आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी रस्ता खोदून ठेवल्याने प्रचंड माती, दगडगोटे रस्त्यावर आले. तालुक्‍यातील भारजा व निवळी या मुख्य नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या असून त्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. 

उमरोली घाटात दरड कोसळली 
सात ठिकाणी भूस्खलन झाल्याने भराव रस्त्यावर आला आहे. वाहने घसरून अपघात होण्याची शक्‍यता बळावली आहे. परिणामी काही तास हा मार्ग बंद झाला. पाणी जाण्यासाठी खोदलेले गटार मातीने पूर्ण भरल्याने सर्व पाणी रस्त्यावरून वाहू लागले. तसेच उमरोली घाटात दरड कोसळून बाणकोट, वेळासकडे जाण्याचा मार्ग बंद पडला होता.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com