भाताला 1450 रुपये दर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

वेंगुर्ले - तालुका खरेदी-विक्री संघामार्फत खरीप हंगामातील भात पीक खरेदीचा प्रारंभ आज वेंगुर्ले तहसीलदार अमोल पोवार यांच्या हस्ते वेंगुर्ले डचवखार येथील शासकीय गोदामस्थळी झाला. 

वेंगुर्ले - तालुका खरेदी-विक्री संघामार्फत खरीप हंगामातील भात पीक खरेदीचा प्रारंभ आज वेंगुर्ले तहसीलदार अमोल पोवार यांच्या हस्ते वेंगुर्ले डचवखार येथील शासकीय गोदामस्थळी झाला. 

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्याच्यादृष्टीने तालुका खरेदी-विक्री संघाने भात पीक खरेदीचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष एम. के. गावडे, जिल्हा बॅंक संचालिका प्रज्ञा परब, सोमेश्‍वर प्रासादिक विकास संस्थेचे चेअरमन समीर कुडाळकर, तहसील पुरवठा विभागाचे कर्मचारी ईश्‍वर सपकाळ, संघाचे व्यवस्थापक हनुमान वराडकर, प्रदीप तेरेखोलकर, विलास फोवकांडे, हेमंत नाईक, शेडगे यांसह भात पीक देण्यास आलेले होडावडा व वजराठ येथील शेतकरी उपस्थित होते. 

तालुका खरेदी-विक्री संघातर्फे भात पीक खरेदीचा प्रारंभ कार्याक्रमात होडावडा येथील हरिश्‍चंद्र राऊळ, अनंत राऊळ, गजानन राऊळ, तारामती सातार्डेकर, वजराठ येथील केशव पालयेकर, मनोहर परब अशा शेतकऱ्यांनी एकूण सुमारे 50 क्विंटल भात खरेदी-विक्री संघाचे दिले. या भात पिकाचा खरेदी दर प्रति क्विंटल 1450 असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 
 

वेंगुर्ले तालुक्‍यातील खरीप हंगामातील भात पीक खरेदी-विक्रीस संघास देणाऱ्या शेतकऱ्यांनी भात खरेदी व्यवस्थापन प्रमुख प्रदीप तेरेखोलकर यांच्याशी संपर्क साधून भात घेऊन यावे म्हणजे वेळ, श्रम व वाहतूक यावर शेतकऱ्यांचा अनाठायी खर्च होणार नाही. तालुक्‍यातील शेतक-यांनी जास्तीत जास्त भात पीक खरेदी-विक्रीस संघास द्यावा. 
- एम. के. गावडे, अध्यक्ष 

Web Title: Rice prices to Rs 1450