रत्नागिरीत भातासाठी क्‍विंटलला 1, 835 रुपये दर 

Paddy Rate decleared in Ratnagiri
Paddy Rate decleared in Ratnagiri

रत्नागिरी - जिल्ह्यात तयार होणारे भात मार्केटिंग फेडरेशनकडून खरेदी करण्यात येते. गतवर्षी 1,122 शेतकऱ्यांकडून 13,295.05 क्‍विंटल भात फेडरेशला दिले. यंदाच्या वर्षी 22 हजार क्‍विंटल धान्य खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून क्‍विंटलचा दर 1, 835 रुपये दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी प्रभाकर चिले यांनी दिली. 

शासन ठरवून देईल, त्या दराने शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी करून ती पुरवठा समितीलो देणे, हे या मार्केटिंग फेडरेशनचे मुख्य काम आहे. यंदाच्या वर्षीचा दर जाहीर झाला असून, प्रतिक्‍विंटल 1,835 रुपये दराने भात खरेदी करण्यात येणार आहे. गतवर्षी हाच दर 1,750 रुपये होता. धान्य खरेदीसाठी जिल्हाधिकारी यांची लवकरच परवानगी घेण्यात येणार असून लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल. जिल्ह्यात या योजनेला 2013-14 मध्ये विक्रमी प्रतिसाद लाभला. त्यावर्षी 24 हजार 498.46 क्‍विंटल भाताची खरेदी झाली होती. यासाठी शासनाने क्‍विंटलचा दर 1,310 रुपये होता. जिल्ह्यातील 1,959 शेतकऱ्यांनी आपल्याकडील भाताची विक्री केली.

भात गोडावूनमध्ये शिल्लक राहिल्यामुळे पुढील दोन वर्षे भाताची खरेदीच झाली नाही. गतवर्षी 1,122 शेतकऱ्यांनी 13 हजार 295.05 क्‍विंटल भात दिले. मार्केटिंग फेडरेशनने क्‍विंटलला 1,750 रुपये दराने खरेदी केली होती. गतवर्षी शेतकऱ्यांना प्रतिक्‍विंटल 500 रुपये बोनसही दिला गेला. मात्र, हा बोनस 50 क्‍विंटलपर्यंतच मर्यादित होता. 

दोन केंद्रे वाढवण्यात येणार.. 
रत्नागिरी जिल्ह्यात खरेदी-विक्री संघ आणि विविध कार्यकारी सोसायटी यांच्यामार्फत धान्याची खरेदी होते. जिल्ह्यात त्यासाठी चौदा केंद्र आहेत. त्यात दोन केंद्रे वाढवण्यात येणार आहेत. खरेदी केलेला भात जिल्हा पुरवठा विभागाच्या ताब्यात दिला जातो. यानंतर हा भात भरडण्यासाठी टेंडर काढण्यात येत. भात भरडल्यानंतर तयार झालेला तांदूळ जिल्ह्यात वितरीत केला जातो. 

हंगाम खरेदी दर (क्‍विंटलचा) 
* 2010-11 15260 1000 
* 2011-12 18731 1080 
* 2012-13 21680 1250 
* 2013-14 24498 1310 
* 2014-15 0.00 1360 
* 2015-16 0.00 1410 
* 2016-17 8556 1470 
* 2017-18 8122 1550 
* 2018-19 13295 1750 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com