राजापूर तालुका: २५ दिव्यांग मुलांना शिक्षणाची दारे खुली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 जानेवारी 2019

राजापूर - शासनाने सक्तीच्या शिक्षण कायद्याअतंर्गत सर्व मुलांना शिक्षण सक्तीचे केले. त्यातून अनेक शाळाबाह्य मुलांसह अपंग, मतिमंद, गतिमंद मुले शाळांमध्ये दाखल झाली. तालुक्‍यातील मतिमंद, अस्थिव्यंग, बहुविकलांग अशा पंचवीस मुलांना शिक्षणाची द्वारे खुली झाली आहेत. 

राजापूर - शासनाने सक्तीच्या शिक्षण कायद्याअतंर्गत सर्व मुलांना शिक्षण सक्तीचे केले. त्यातून अनेक शाळाबाह्य मुलांसह अपंग, मतिमंद, गतिमंद मुले शाळांमध्ये दाखल झाली. तालुक्‍यातील मतिमंद, अस्थिव्यंग, बहुविकलांग अशा पंचवीस मुलांना शिक्षणाची द्वारे खुली झाली आहेत. 

शरीराने अपंग, मूकबधिर असले तरी, मनाने खंबीर असलेले अनेक अपंगांनी विविध क्षेत्रामध्ये आपल्या कलाकौशल्याच्या जोरावर झेप घेतल्यची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. शासनाने अपंगांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी घेतलेले प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसून येते. आजही अपंग मुलांना त्यांच्या वय आणि बुद्धीनुसार प्राथमिक शाळांमध्ये इयत्तेनुसार दाखल केले जाते. यासाठी शासनातर्फे अपंग समावेशक योजनाही राबविली जाते.

सक्तीच्या शिक्षण कायद्याअंतर्गत हे विद्यार्थी शाळेमध्ये दाखल झाल्याने त्यांना अन्य मुलांसमवेत शिक्षण घेत त्याचा आनंद लुटण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मात्र, शारीरिक असलेल्या अपंगत्वामुळे त्यांना शाळेत ये-जा करणे शक्‍य होत नाही. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पंचायत समितच्या शिक्षण विभागातर्फे गृहमार्गदर्शन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये विशेष शिक्षकांकडून या विद्यार्थ्यांना घरी जाऊन मार्गदर्शन केले जाते.  

दृष्टिक्षेपात बौद्धिक अक्षमता वा मतिमंद विद्यार्थी
    मुलगे    मुली    एकूण
अंध    ३    २    ५
अंशतः अंध    २९    २८    ५७  
कर्णबधिर    १९    १३    ३२
वाचा न भाषादोष    २२    १०    ३५
अस्थिव्यंग    २०    २६    ४६
मानसिक आजार    -    २    २
अध्ययन अक्षम    ७१    ५४    १२५
मेंदूचा पक्षाघात    ४    २    ६
स्वमग्न    २    १    ३
बहुविकलांग    १३    ९    २२
 एकूण    १८३    १५०    ३३३
 

Web Title: Right to education helps Handicap students in Rajapur Taluka

टॅग्स