रायगडाची पर्यायी वाट खडतर, दगडगोट्यांच्या मार्गावर होतेय घसरण

सुनील पाटकर
बुधवार, 5 डिसेंबर 2018

महाड - रायगड संवर्धन कामांतर्गत रायगडावर चित्त दरवाजा ते हत्ती तलाव या पायरीमार्गाची दुरुस्तीचे काम सुरु असल्याने हा मुख्य मार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे गडावर पायी जाणाऱ्यांकरिता नाना दरवाजा हा पर्यायी मार्ग सुरु करण्यात आला आहे. या मार्गावर पायऱ्या नसल्या तरी तीव्र उतार आणि मार्गावर असलेल्या दगड गोट्यांमुळे हा मार्ग शिवप्रेमींसाठी खडतर झाला आहे, त्यातच आता शैक्षणिक सहलींनाही सुरुवात होत असल्याने मुलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण जाला आहे.

रायगड किल्ला संवर्धनाचे काम रायगड प्राधिकरणाच्या माध्यामतून सुरु आहे. चित्त दरवाजा ते हत्ती तलाव पर्यंतच्या पायऱ्यांची प्रचंड दुरवस्था झाली होती. गेले कांही वर्षात या मार्गावर अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते. यामुळे हा मार्ग पर्यटकांसाठी धोकादायक बनला होता. सद्या या मार्गाचे काम सुरु असून हा संपूर्ण मार्ग उखडून काढण्यात आला आहे. यामुळे महादरवाजा ते चित्त दरवाजा पर्यंतचा  पायरी मार्ग पूर्णत बंद करण्यात आला आहे. गडावर ये जा करण्यासाठी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या नाना दरवाजा मार्ग बंद अवस्थेत होता. हा मार्ग सध्या पर्यायी मार्ग म्हणून सुरु करण्यात आला आहे. मात्र या मार्गावर उतार आणि खाच खळ्गे, छोटे दगड असल्याने हा मार्ग गड उतरत असताना धोकादायक आहे. साफसफाई न करताच हा मार्ग सुरु केल्याने अनेक पर्यटक या वाटेवर घसरून पडत आहेत. तर अनेकांच्या पायातील चपला, बूट तुटून पडत आहेत.या मार्गाच्या कडेला ठिकठिकाणी तुटलेले बुट, चपला दिसून येत आहेत. चित्त दरवाजा ते वाळसुरे खिंड यादरम्यान काम सुरु केल्याने नाना दरवाजा मार्गे वाळसुरे खिंडीपर्यत आणि तेथून महादरवाजा ते हत्ती तलावापर्यंत जाणे शक्य होते परंतु आता वरील बाजूने देखील काम सुरु केल्याने देण्यात आलेल्या पर्यायी मार्गाचा देखील उपयोग होणार नाही. 

Web Title: road to raygad in dangerous