रस्ता सुरक्षा जागृतीसाठी नाकाबंदी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

सावंतवाडी - रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून आज येथील पोलिस प्रशासनाकडून शहरात नाकाबंदी करण्यात आली. या वेळी सुमारे पंचावन्न वाहनधारकांवर नियम न पाळल्याने कारवाई करण्यात आली. वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस प्रशासनाकडून या वर्षी 28 वा रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर आज येथील महाविद्यालयाच्या परिसरात पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. अचानक पोलिसांकडून अशा प्रकारे मोहीम राबविल्याने नागरिकांतून प्रश्‍नचिन्ह व्यक्त होत होते. 

या वेळी जिल्हा वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांकडून तब्बल पंचावन्न वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. यात महाविद्यालयीन युवकांचा भरणा मोठा होता. या वेळी पोलिस निरीक्षक शंकर पाटील, सहायक निरीक्षक अरुण जाधव, वाहतूक पोलिस राजा राणे, हनुमंत धोत्रे, प्रथमेश आरोसकर, वर्षा वसावे आदी उपस्थित होते.

Web Title: Road safety awareness to the blockade