तुराडे गावाजवळील ओहोळावरील साकव दुरुस्त 

लक्ष्मण डुबे 
मंगळवार, 12 मार्च 2019

रसायनी (रायगड) - रसायनीतील मुख्य रस्त्यावरील तुराडे गावा जवळ एका ओहोळावरील साकव धोकादायक बनला होता. या साकवचा एक बाजुचा कठडा तुटला होता. त्यामुळे रात्रिच्या वेळेस अपघाताची भिती होती. संरक्षक कठाडे बांधण्यात यावेत आशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची सकाळने सोमवार ता 25 फेब्रुवारी रोजी बातमी प्रसिद्ध केली आहे. या बातमीची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली. एक तुटलेला संरक्षक कठडा बांधण्यात आला असल्याने वाहतुकीला दिलासा मिळला आहे. 

दांड पेण या राज्य मार्गावर तुराडे गावा जवळ पुर्व बाजुस ओढ्यावर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. म्हणुन पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील व क्षेत्रा बाहेरील कारखाने तसेच रसायनी पाताळगंगा परीसरातील गावांतील या रस्त्यावरील पेण, अलिबाग व उरणकडे जाणारी वाहतुक पश्चिम बाजुच्या जुन्या रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे. या रस्त्यावरील साकवचा एक संरक्षक कठडा तुटला होता. रात्रिच्या वेळेस येथे साकव असल्याचे दिसत नाही. त्यामुळे अपघाताची भिती वाहन चालकांनी व्यक्त केली होती. 

दरम्यान, साकववर नवीन संरक्षक कठाडे बांधावेत आणि त्वरित जवळ धोकादायक सुची लावण्यात याव्यात. आशी मागणी शिवसेना गुळसुंदे विभाग प्रमुख ज्ञानेश्वर माळी आणि इतरांनी केली होती. दरम्यान काँक्रीटात संरक्षक कठडा बांधण्यात आला असल्याने वाहन चालक समाधान व्यक्त करत आहे. तसेच कठड्यांच्या दोन्ही बाजुस लवकरात धोकादायक सुची बसविण्यात याव्यात आशी मागणी ज्ञानेश्वर माळी यांनी केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: road work has doe near the village of Turade