पुरहानीतून रस्त्यांसाठी 78 कोटी ः वैभव नाईक

roads 78 crore funds konkan sindhudurg
roads 78 crore funds konkan sindhudurg

मालवण (सिंधुदुर्ग) -  अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवून नुकसान झालेल्या जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष पूरहानी दुरुस्ती कार्यक्रम 2020-21 अंतर्गत 78 कोटी 63 लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्याद्वारे मुख्यमंत्र्यांनी वचनपूर्ती केली. यामुळे विरोधकांच्या आरोपांना चपराक बसली आहे, असे आमदार वैभव नाईक यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

गतवर्षी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे मोठे नुकसान झाले होते. याबाबत 27 ऑक्‍टोबर 2020 ला मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अतिवृष्टीचा आढावा घेतला होता. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत व आमदार नाईक यांनी नुकसानग्रस्त रस्ते दुरुस्तीसाठी 100 कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी केली होती.

त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी 75 कोटी देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार त्यांनी दिलेला शब्द पाळला असून, 78 कोटी 63 लाखांचा निधी मंजूर केला आहे. कुडाळ, मालवण तालुक्‍यासाठी 35 कोटी 79 लाख 64 हजार रुपये मंजूर झाले आहेत. दुरुस्तीची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहेत. 

मार्ग आणि निधी रुपयात 
मठ, कुडाळ, पणदूर, घोटगे ते गारगोटी राज्य मार्ग ः दोन कोटी 13 लाख 35 हजार रुपये 
आचरा बंदर, वरवडे, फोंडा, उंबरणे राज्य मार्ग- 11 कोटी 2 लाख 36 हजार रुपये 
चिंदर, कुडोपी, बुधवळे मार्ग- 96 लाख 20 हजार 
कोटकामते, बुधवळे, बिडवाडी मार्ग - 83 लाख 
राठिवडे, कसाल, ओसरगाव मार्ग - 52 लाख 22 हजार 
वागदे, कसवण, कसाल मार्ग - 1 कोटी 41 लाख 75 हजार 
वायंगणी, तळाशील- 22 लाख 
रानबांबुळी, ओरोस, वर्दे मार्ग - 51 लाख 24 हजार 
मालवण-कसाल राज्यमार्ग- 32 लाख 50 हजार 
झाराप-आकेरी राज्य मार्ग- 2 कोटी 42 लाख 50 हजार 
कनेडी, कुपवडे, शिवापूर, विलवडे राज्य मार्ग - 1 कोटी 40 लाख 
सुकळवाड, बांव रस्ता - 37 लाख 50 हजार 
कुडाळ, पिंगुळी, कोचरे रस्ता - 78 लाख 40 हजार 
वेताळबांबर्डे, वाडोस रस्ता - 20 लाख 
कुडाळ, पावशी, आंबेरी रस्ता - 4 कोटी 61 लाख 40 हजार 
चौके, धामापूर, कुडाळ रस्ता - 89 लाख 
कुडाळ रेल्वेस्टेशन रस्ता - 38 लाख 
वालावल, आंदुर्ले, मुणगी रस्ता - 1 कोटी 25 लाख 
नेरूर, चेंदवण, कवठी रस्ता- 1 कोटी 35 लाख 85 हजार 
पिंगुळी, मानकादेवी रस्ता- 1 कोटी 26 लाख 2 हजार 
दाभोली, तेंडोली, माड्याचीवाडी रस्ता- 1 कोटी 29 लाख 71 हजार 
आकेरी, दुकानवाड, शिवापूर रस्ता- 1 कोटी 25 लाख 46 हजार 
राठिवडे, असरोंडी, ओसरगाव रस्ता- 21 लाख 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com