दोडामार्ग : आंबेली येथे रस्त्यात वृद्धेला लुबाडले 

दोडामार्ग : आंबेली येथे रस्त्यात वृद्धेला लुबाडले 

दोडामार्ग - मोपेडवरून आलेल्या दोघांनी पायवाटेने घरी जाणाऱ्या वृद्ध महिलेला लुबाडल्याची घटना आज साडेअकराच्या आंबेली येथे घडली. चोरट्यांनी महिलेच्या सोन्याची माळ हिसकावून घेत तिला ढकलून देऊन पळ काढल्याने वृद्धा जखमी झाली. तिच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुभद्रा गोपाळ गवस (वय 70) असे जखमीचे नाव आहे. 

सुभद्रा गवस या दोडामार्ग आठवडा बाजारातून घरी येत होत्या. मुख्य रस्त्यावरून त्या घराकडे जात असताना मोपेडवरून आलेल्याने आजी कुठे जातेस, थांब असे म्हणून थांबवले आणि गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी विरोध करताच रस्त्यावरचा दगड उचलून डोक्‍यावर मारला आणि ढकलून दिले. त्यात त्या जखमी झाल्या.

स्थानिक आणि पोलिसांनी त्यांना उचलून येथील रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्‍याला आणि उजव्या हाताला तसेच उजव्या डोळ्याला मार लागला आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी श्री. मुळीक, पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, श्री.बागूल आणि अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. जखमी महिलेची भेट घेऊन माहिती घेतली. त्यांनी दिलेल्या वर्णनावरून दुचाकी आणि चोरटयांचा शोध घेण्यात येत आहे. तथापी अद्याप श्‍वानपथक मागवण्यात आले नसल्याचे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com