सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक फोडणारे चौघे गजाआड 

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक फोडणारे चौघे गजाआड 

कुडाळ - तालुक्‍यातील वारंगाची तुळसुली येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी काही तासातच चार संशयितांना पकडण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाला यश मिळाले. घटना शुक्रवारी (ता.5) रात्री उशिरा घडली होती. संशयितांसह मोटरसायकल, गॅस सिलिंडर, गॅसकटर असे साहित्य जप्त केले. 

समिर ऊर्फ सोनू विठ्ठल राऊळ (वय 29, रा.लक्ष्मीवाडी कुडाळ), कृष्णा रविकांत शिंदे (20, रा.मुळदे फौजदारवाडी), लक्ष्मण गणपत नारिंग्रेकर ( 26, रा.नेरूर) यांसह अन्य एकाचा समावेश आहे. 

वारंगाची तुळसुली येथील जिल्हा बॅंकेच्या शाखेत अज्ञातांकडून शुक्रवारी (ता.5) रात्री खिडकीचे कापून चोरीचा प्रयत्न झाला होता. याची फिर्याद बॅंक मॅनेजर निलम उत्तम सराफदार यांनी येथील पोलिस ठाण्यात काल (ता.6) दिली होती. यानुसार अज्ञातांवर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले होते. येथील पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला होता. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडेही याबाबतचा तपास दिला होता.

तपासादरम्यान संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका गॅस कटरधारकावर संशय होता. यानुसार त्याला स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने येथील पोलिसांच्या सहकार्याने शनिवारी रात्री ताब्यात घेतले. चौकशीत अन्य तिघांची नावे उघड होताच तपासाची चक्रे वेगाने फिरवून या पथकाने त्या तिघांच्याही मुसक्‍या आवळल्या.संशयितांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्‍यातील अन्य दोन चोऱ्यामध्ये त्यांचा हात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 

या संशयितांना कुडाळ पोलिसांनी अटक करून सायंकाळी वेंगुर्ले येथील न्यायालयात हजर केले. या संशयितांचा अन्य आणखी कीती चोऱ्यांमध्ये हात आहे याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडी मागितली. तुळसुलीतील या चोरीच्या घटनेनंतर कुडाळ पोलिसही या घटनेतील संशयितांच्या मागावर होते.

या पथकात जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलिस अधीक्षक निमित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद पाटील, कुडाळ पोलिस ठाण्याचे निरिक्षक शंकर कोरे यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक वनिता कुलकर्णी, उपनिरीक्षक विराज फडणीस, शाहू देसाई, गुरूनाथ कोयंडे, आशिष गंगावणे, अनुप खंडे, अमित पालकर, संकेत खाडये, जयेश सरमळकर, स्वप्निल तोरसकर, रवी इंगळे, ज्ञानेश्वर कांदळगांवकर व दिव्या राणे यांचा सहभाग होता. 

चोरट्यांकडून साहित्य जप्त 
या संशयितांकडून दोन मोटरसायकल, तीन गॅस सिलिंडर, लॉकर तोडण्यासाठी लागणारे गॅस कटर, हातोडी अशा प्रकारचे साहित्य जप्त केले आहे. संशयितांनी तुळसुली येथील बॅक चोरीची कबूली दिली असल्याचे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com