काजूगर दरात १५० रुपयांनी घसरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

बाजारपेठेतील तयार मालाची घसरण अशीच सुरू राहिली, तर त्याचा परिणाम सर्वांवरच होणार आहे. काजू प्रक्रिया केल्यानंतर गर पडत्या भावात विकावा लागला, तर उद्योजकांचे गणित बिघडणार आहे. त्यामुळे नाईलाजाने काजू बीला कमी किंमत द्यावी लागेल. याचा फटका थेट बागायतदाराला होईल. 
- दीपक शिंदे, बागायतदार, अनारी

चिपळूण - येथील स्थानिक मार्केटमध्ये काजूगराचे दर किलोमागे १०० ते १५० रुपयांनी कोसळले आहेत. याचा बागायतदारांना मोठा फटका बसण्याची भीती आहे.

काजू बीला चांगला दर मिळत असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजू लागवड झाली. पारंपरिक शेती व्यवसायाला आंबा पिकाबरोबरच काजूच्या उत्पन्नाची जोड मिळाली. गेल्यावर्षी चांगल्या काजूगराला सरासरी ८०० ते ८५० पर्यंतचा भाव मिळाला होता. त्यामुळे काजू बीला १५० ते १७० रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. मात्र, काही व्यावसायिकांकडे अजूनही गेल्यावर्षीची काजू बी शिल्लक आहे. परदेशातूनही काजूगराची मागणी घटली आहे. बाजारपेठेमध्ये काजूगराचे दर कोसळले आहेत. काजू बीच्या हंगामाला आता सुरवात होत आहे. सुरवातीला स्थानिक बाजारपेठेत काजू गराला सरासरी ६०० रुपये भाव मिळू लागला आहे. येत्या काळात हा दर आणखी घसरून त्याचा परिणाम काजू व्यावसायिकांबरोबर बागायतदारांवरही होण्याची भीती आहे. 

बाजारपेठेतील तयार मालाची घसरण अशीच सुरू राहिली, तर त्याचा परिणाम सर्वांवरच होणार आहे. काजू प्रक्रिया केल्यानंतर गर पडत्या भावात विकावा लागला, तर उद्योजकांचे गणित बिघडणार आहे. त्यामुळे नाईलाजाने काजू बीला कमी किंमत द्यावी लागेल. याचा फटका थेट बागायतदाराला होईल. 
- दीपक शिंदे,
बागायतदार, अनारी

Web Title: Rs. 150 per kg fall in cashew cost