असभ्य वर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाला न्यायालयीन कोठडी

असभ्य वर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाला न्यायालयीन कोठडी

वेंगुर्ले - तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या त्याच शाळेतील शिक्षक जयप्रकाश तेरसे याला ओरोस जिल्हा न्यायालयात हजर केले असता १२ ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

तालुक्‍यातील ग्रामीण भागातील एका चार शिक्षक असणाऱ्या शाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीशी त्याच शाळेतील शिक्षकाने इतर शिक्षक नसल्याची संधी साधत संगणक खोलीत नेऊन असभ्य वर्तन केल्याची घटना गुरुवारी (ता. २७) घडली होती. शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी ही घटना असून, संबंधित शिक्षक हा कुडाळ येथील मूळ रहिवासी आहे. त्याला काल (ता. २८) सायंकाळी वेंगुर्ले पोलिसांनी शिरोडा येथे राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्याला अटक केली होती. याबाबत येथील पोिलस ठाण्यात शिक्षक जयप्रकाश तेरसे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com