रत्नागिरीत दिव्यांगांसाठी ५० लाखांची तरतूद : उदय सामंत

rupees five lakh fund for special child in ratnagiri said uday samant
rupees five lakh fund for special child in ratnagiri said uday samant

ओरोस (रत्नागिरी) : जिल्हा परिषद पाच टक्के सेस व्यतिरिक्त जिल्ह्यातील दिव्यांगांना विविध प्रकारची मदत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५० लाख रुपये निधीची तरतूद करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी  सांगितले. जिल्हा परिषद सेस पाच टक्के निधीचे नियंत्रण करण्यासाठीच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मदन भीसे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यासह समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

एकूण निधी असा...

या वेळी बैठकीमध्ये विविध योजनांसाठी एकूण १ हजारपेक्षा जास्त प्रस्ताव सादर केल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण ४१ लाख २० हजार ८५० रुपयांचा निधी आहे. पैकी सार्वजनिक इमारतींना रॅम्प बांधण्यासाठी ९५ हजार रुपये, जनजागृतीसाठी ५० हजार, अस्थिव्यंग व्यक्तींसाठी स्वयंचलित तीन चाकी सायकलसाठी २० लाख, पिठाची गिरणी देण्यासाठी एक लाख, दिव्यांगासाठी घरकूल योजनेसाठी नऊ लक्ष, कुकुटपालनासाठी दोन लाख, अशा प्रकारे निधी असल्याचे समाजकल्याण अधिकाऱ्यांनी सांगितले.

"जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झालेले सर्व प्रस्ताव बैठकीत समितीसमोर ठेवले आहेत. यावर समितीने योग्य तो निर्णय घ्यावा. दिव्यांगांच्या मदतीसाठीचे नियोजन करावे. दिव्यांगासाठी असलेल्या निधीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत."

- उदय सामंत, पालकमंत्री

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com