सावंतवाडी पालिकेत उडाणटप्पूंचा वावर; `यांनी` केली टीका

 Rupesh Raul Comment On Sawantwadi Corporation
Rupesh Raul Comment On Sawantwadi Corporation

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - येथील पालिकेमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर शहराची शांतता बिघडविण्याचे काम चार महिन्यात नगराध्यक्ष संजू परब यांनी केले. सायंकाळी सहानंतर पालिकेमध्ये उडाणटप्पूंचा अड्डा असतो. हे संस्थानची राजधानी असलेल्या शांत व सुसंस्कृत सावंतवाडी शहराला शोभनीय नाही. त्यामुळे आपली जबाबदारी व कर्तव्य ओळखून त्यांनी काम करावे, असा सल्ला वजा टीका शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे केली. 

नगराध्यक्ष या नात्याने श्री. परब यांना शहरात शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास शिवसेनेचे नेहमी सहकार्य राहील; मात्र त्यांनी यात राजकारण करू नये. सर्वांना सोबत घेऊन शिवरायांना शोभेल असे राज्य याठिकाणी निर्माण करावे, असेही श्री. राऊळ यांनी स्पष्ट केले. 

शहरातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. राऊळ बोलत होते. यावेळी शहरध्यक्ष खेमराज ऊर्फ बाबू कुडतरकर, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब आदी उपस्थित होते.

श्री. राऊळ म्हणाले, ""तमाम शिवप्रेमींची इच्छा असलेला शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा सावंतवाडीसारख्या शहरात उभा होणार हे एक शिवप्रेमी या नात्याने मला अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे संस्थानचा वारसा लाभलेल्या या शहरात प्रथम नागरिक या नात्याने नगराध्यक्षांनी जाहीर केलेल्या या निर्णयाला शिवसेना म्हणून आमचे पूर्ण सहकार्य राहणार आहे. ज्या ज्या गोष्टींसाठी जिथे जिथे गरज लागेल त्याठिकाणी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सहकार्य देऊ; मात्र या गोष्टींचा बाऊ करून श्री. परब यांनी कुठल्याही प्रकारे राजकारण करू नये. सर्व्हे केलेल्या तीन ठिकाणांपैकी योग्य अशा जागेवर हा पुतळा उभारण्यात यावा.'' 

श्री. राऊळ यांनी नगराध्यक्ष श्री. परब यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ""आजपर्यंत या शहराला अनेक नगराध्यक्ष लाभले. प्रत्येकाने शहराची शांतता व संस्कृती जपण्याचे काम केले आहे; मात्र अलीकडे पालिकेमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर नगराध्यक्ष या नात्याने परब हे काम पाहू लागले आहे; परंतु चार महिन्यातच शहराच्या शांततेला डाग लावण्याचे काम त्यांच्याकडून झाले. यामध्ये व्यापाऱ्यांमध्ये पडलेली फुट, पालिकेमध्ये सत्ताधाऱ्यांकडून महिला कर्मचाऱ्यांना होणारी शिवीगाळ तसेच उडानटप्पूंचा वाढलेला वावर हे शहराला अशोभनीय आहे. पूर्वीच्या नगराध्यक्षांनी दाखवलेला समजूतदारपणा आताच्या नगराध्यक्षांमध्ये दिसून येत नाहीत. कुठेतरी या अगोदरच्या नगराध्यक्षांनी केलेले कार्य आणि कामाला यामुळे भेग पडत आहे. त्यामुळे श्री. परब यांनी एकीकडे पुतळा उभारण्याचे उचलेले चांगले पाऊल लक्षात घेता शहराच्या दृष्टीनेही शहराची शांतता व संस्कृती अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावेत.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com