सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीवरोधात ग्रामस्त आक्रमक

अमित गवळे 
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पाली - सुधागड तालुक्यातील वसुधा सामाजिक वनीकरण व वृक्षलागवड संस्थेविरोधात विडसई व वाफेघर ग्रामस्त मागील चार ते पाच वर्षापासून लढा देत आहेत. या संस्थेत सुरु असलेली अनधिकृत बांधकामे थांबविण्यात यावीत या मागणीचे निवेदन नुकतेच ग्रामस्तांनी रायगड जिल्हाधिकारी  व पाली तहसिलदारांना दिले. वसुधा सोसायटीत सुरु असलेली बांधकामे त्वरीत न थांबविल्यास व विकसकावर कायदेशीर कारवाई न केल्यास पुन्हा एकदा येत्या 10 तारखेला आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा ग्रामस्तांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

वसुधा संस्थेमध्ये 3500 ते 4000 (चौरसफूट) आर.सी.सी बंगल्यांचे अनधिकृत बांधकाम सुरु असल्याचा आरोप ग्रामस्तांनी केला. या बांधकामाविरोधात पाली-सुधागड तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांची वाफेघर व विडसई ग्रामस्तांनी भेट घेतली. यावेळी पाली तहसिलदार यांनी ग्रामस्तांना सांगितले की या बांधकामाविरोधात सबंधीत विकासकाने कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यानंतर ग्रामस्तांनी तहसिलदारांना या अनधिकृत बांधकामाविरोधात दोन वेळा निवेदन दिली. तसेच खवली ग्रुप ग्रामपंचायतीकडून सुध्दा सबंधीत बांधकामास कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या विकसकावर नेमका कोणाचा वरदहस्त आहे असा सवाल ग्रामस्तांनी उपस्थीत केला आहे. 

वसुधा सामाजिक वनीकरण व वृक्षलागवड संस्थेचा हेतू काय आहेत यासंदर्भातील अटी व शर्ती लेखी स्वरुपात जिल्हाधिकारी रायगड यांनी दिल्या आहेत. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या कुठल्याही अटी व शर्तीचे पालन संस्था करीत नसल्याचा आरोप ग्रामस्तांनी निवेदनात केला आहे. तसेच संस्था शेतघर बांधण्यासाठी परवानगी मागते मात्र वस्तुतः तिथे शेतघर नसून मोठमोठे आर.सी.सी बंगले बांधण्यात येतात. ही संस्था शासनाची दिशाभूल करीत आहे. संस्थेचे आतापर्यंत गावाचे नदीवर जाणारे मार्ग, पाउलवाटा, शेतीवर जाणारे मार्ग मोकळे केलेले नाहीत. त्यामुळे या संस्थेला कोणत्याही स्वरुपाची परवानगी देण्यात येऊ नये व त्यांची सुरु असलेली अनधिकृत बांधकामे त्वरीत थांबविण्यात यावीत अशी मागणी वाफेघर विडसई ग्रामस्तांनी केली आहे. यासंदर्भात त्वरीत कारवाई न केल्यास  10 डिसेंबर रोजी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. 

Web Title: Rural Awakening in Vasundhana Society in Sudhagad Taluka