ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान...

ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान...

पाली : ग्रामीण सामाजिक परिवर्तन अंतर्गत निवडलेल्या महागाव ग्रामपंचायतीला नुकतेच आय.एस.ओ.मानांकन देवून गौरविण्यात आले. गावाच्या प्रगतशिल वाटचालीचा आढावा घेण्यासाठी ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम,रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी तसेच तालुका व जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांनी शनिवारी (ता. 28) रोजी महागाव ग्रामपंचायतीला भेट देवून त्यांच्या कामाचा अाढावा घेतला.

मागास व दुर्लक्षित राहिलेल्या खेडेगावांचा सर्वांगिण व शास्वत विकास साधण्याच्या दृष्टीकोणातून महाराष्ट्रातील एक हजार गावे विकसीत करण्याचे मिशन शासनामार्फत हाती घेण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील 22 गावांचा ग्रामपरिवर्तन योजनेत समावेश असून यामध्ये सुधागडातीलमहागाव, नांदगाव, चिवे, नाडसूर, राबगाव,नवघर या गावांचा समावेष आहे.

यावेळी जिल्हाधिकारयांनी सांगितले की ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे गावाच्या विकासासाठी शासन विविध प्रकारच्या नाविण्यपुर्ण योजना राबवीत आहे.ग्रामस्तांनी गावाची समृध्दी व सामाजिक परिवर्तनासाठी एकजुटीची कास धरावी व सामाजिक परिवर्तनाला योग्य दिशा द्यावी असे आवाहन रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी केले. गावाच्या विकासाच्या दृष्टीकोणातून भविष्यात अधिकाधिक शासन योजना व उपक्रम राबविण्या संदर्भात महत्वपुर्ण चर्चा केली. तसेच यांनी महागाव ग्रामस्त व महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामपंचायतीच्या कामाचा आढावा घेतला. जलयुक्त शिवार अंतर्गत कामाबद्दल ग्रामस्तांशी सविस्तर चर्चा केली. रोजगार हमी योजनेबद्दल चर्चा करुन येत्या काळात नागरीकांनी जास्तीत जास्त कामे रोजगार हमी योजनेतून घेण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर येथील शिक्षण, आरोग्य, नेटवर्कींग सुवीधा आदि विषयांवर जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी ग्रामस्तांशी संवाद साधला. जलस्त्रोत वाढविण्याच्या दृष्टीकोणातून गावातील सर्व तलावांचा गाळ काढून श्रमदान करण्याची सुचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी केली. गावात नालाबंदी करण्यासाठी ग्रामस्तांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.सर्वप्रथम गाव पाण्याने समृध्द करा, शेती वाढवा असा मार्गदर्शक सल्ला डॉ. सुर्यवंशी यांनी दिला. नरेगाच्या माध्यमातून गावाच्या समस्या व अडीअडचणी सोडविल्या जातील अशी शास्वती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.ग्रामस्तांशी चर्चा केल्यानंतर स्त्री शक्ती महिला बचत गटाने नव्याने सुरु केलेल्या एल.ई.डी बल्ब उद्योगाला भेट दिली. व महिलांच्या कौशल्य व मेहनतीचे कौतुक केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी संपुर्ण टिमसह येथील निसर्गरम्य व पर्यटनस्थळ असलेल्या पडसरे धबधबा परिसराला भेट दिली. व पडसरे धबधबा परिसराला भविष्यात पर्यटनस्थळ म्हणून नावारुपास आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी आश्वासीत केले. ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम,रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी आदिंनी ग्रामपरिवर्तन अभियानातील नवघर ग्रामपंचायतीला देखील भेट देवून कामकाजाची माहिती करुन घेतली. यावेळी ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम, रायगड जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, वि.एस.टि.एफ मॅनेजर युवराज सासवडे,दिलीपसिंग बायस, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वदेस मंगेश वांगे, सरपंच संगिता पडवळ, उपसरपंच भालचंद्र पार्टे, कृषी सहाय्यक कदम, राजेश जैन, तुषार इनामदार, पाली सुधागड तहसिलदार बि.एन.निंबाळकर, गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे, ग्रामपरिवर्तक विनोद ठिकणे, भास्कर पार्टे,तलाठी प्राजक्ता मेकडे, सचिन शिर्के, रवि कांबळे आदींसह ग्रामस्त, ग्रामपरिवर्तक बहुसंख्येने उपस्थीत होते.

महागावच्या विकासाचा चढता अालेख
महागाव ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत कोंडप व गोमाचीवाडी मध्ये नळपाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. एक अंगणवाडी व शाळा बोलकी करण्याचे काम सुरु आहे. सर्व शाळांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. पर्यटन विकास साधला जात आहे. तसेच महिला एल.ई.डी बल्बचे उत्पादन प्रकीया सुरु करण्यात आली असल्याची माहिती महागाव ग्रामपरिवर्तक विनोद ठिकणे यांनी दिली आहे. महागाव येथील दारुंबंदीसाठी महिलांनी पुढाकार घेतला असून एक ते दिड महिण्यात शंभर टक्के दारु बंदी करणार असल्याचा एकमुखी निर्धार ग्रामस्तांनी यावेळी केला.

ग्रामिण सामाजिक परिवर्तनास तनिष्काची हि साथ
ग्रामीण सामाजिक परिवर्तन योजनेच्या यशस्वीतेसाठी सरकारची विविध खाती, सकाळ माध्यम समुहाचे तनिष्का व्यासपीठ, विविध उद्योगसमुह, स्वयंसेवी संस्था, व लोकसहभाग यातून सर्वांगिण विकासाचे मॉडेल राबविणारी ही योजना आहे. यामध्ये आरोग्य, रोजगार, स्वच्छता,मलनिःसारण, शेती, प्रशिक्षण, घरकुल योजना, दुर्गम भागात टेलीविजनची सुविधा, डिजीटल कनेक्टीविटी, कौशल्यविकास, जलसंचय या मुख्य मानव विकास निर्देशांवर भर दिला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com