सिंधुदुर्गमुळे उत्तम मराठी शिकलो - उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्याने आपल्याला चांगल्या गोष्टी शिकविल्या. यामुळे आपण उत्तम मराठी बोलू शकलो. येथील वनविभागाचे काम उत्तरोत्तर प्रगतीपथावर नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून यासाठी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे भावोद्‌गार मावळते सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी आज त्यांच्या बदलीपर निरोप समारंभात बोलताना काढले. 

श्री. रमेशकुमार यांची बदली यवतमाळ उपवनसंरक्षकपदी झाली असून त्यांच्या जागी सांगली उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.

या वेळी नूतन सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, सहायक वनसंरक्षक प्रकाश बागेवाडी, सहायक वनसंरक्षक प्रादेशिक व कॅम्पाचे सुभाष पुराणिक, सावंतवाडी वनक्षेत्रपाल विजय कदम, वनक्षेत्रपाल (फिरते) संजय कदम, वैभववाडी वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, दोडामार्ग वनक्षेत्रपाल सचिन आठवले, कार्यालयीन अधीक्षक बळिराम जाधव, कुडाळ वनक्षेत्रपाल प्रदीप कोकितकर आदींसह वनकर्मचारी, वनरक्षक व वनपाल उपस्थित होते.
येथील वनविभाग कार्यालयात निरोप समारंभ कार्यक्रम झाला. 

श्री. रमेशकुमार म्हणाले, ‘‘शासकीय सेवेत बदली पुढे ढकलता येत नाही; परंतु आपला येथील अनुभव चांगला आहे. सिुंधुदुर्गात येऊन बऱ्याचशा गोष्टी शिकलो, तर नवनियुक्त उपवनसंरक्षक चव्हाण यांनी प्लॅनिंगमध्ये काम केले आहे. त्यामुळे ते सावंतवाडी विभागात चांगले काम करतील.’’

वनक्षेत्रपाल श्री. कदम म्हणाले, ‘‘कुडाळ येथील हत्ती हटाव मोहिमेत रमेशकुमार यांनी चांगले काम केले. एकत्र राहून काम कसे करावे हे त्यांनी शिकविले.’’

या वेळी सहायक उपवनसंरक्षक प्रकाश बागेवाडी, सहायक वनसंरक्षक प्रादेशिक व कॅम्पाचे सुभाष पुराणिक आदींनी मनोगत व्यक्त केले. 

चव्हाण यांच्याकडून जंगल संपत्तीचा आढावा
कार्यालयातील पदांबरोबर जंगल संपत्तीबाबत नूतन उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी सर्व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी काम करण्याची आपली वेगळी स्टाईल कशी आहे, याची माहिती दिली. या वेळी कार्यालयाच्या वतीने एस. रमेशकुमार यांना उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या हस्ते शाल, श्रीफळ तसेच कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीची प्रतिमा देऊन सत्कार केला. आभार श्री. कट्टी यांनी मानले.

Web Title: s. rameshkumar talking