#SaathChal माउलींच्या प्रेरणेने सतरा वर्षे वारी - प्रवीण हेळेकर

मकरंद पटवर्धन
शनिवार, 21 जुलै 2018

रत्नागिरी : पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी निघणारी आषाढीची वारी प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी. जो एकदा वारी करतो तो दरवर्षी करतोच. रत्नागिरीतीलही वारकरी गेली अनेक वर्षे वारीला जात आहेत. वारीत कितीही किलोमीटर चालण्याचा त्रास होत नाही. त्रास झालाच तर तो सहन करण्याची ताकद माउली देतात, असा विश्‍वास सार्‍या वारकर्‍यांना वाटतो, हा अनुभव आहे रत्नागिरीतील माउली ग्रुपचा.

या ग्रुपतर्फे गेल्या 17 वर्षांपासून स्थानिक  वारीत सहभागी होत आहेत. याबाबत प्रवीण हेळेकर यांनी सांगितले, रत्नागिरीचे विठ्ठल मंदिर प्रतिपंढरपूर म्हणून सुपरिचित आहे. फक्त पंढरपूरला जाऊन विठूमाउलींचे दर्शन घेणारे अनेक भाविक आहेत. आपण वारीत भाग घेतला पाहिजे, अशी प्रेरणा माउलींकडूनच मिळाली. नितीन कानविंदे हे दरवर्षी वारी करतात. त्यांच्याकडून माहिती घेऊन माउली ग्रुप सुरू केला आणि विनाखंड 17 वर्षे वारी करतोय. माउली ग्रुपमध्ये राजा केळकर, राजू तोडणकर, सतीश काळे, अभय खानोलकर, संजू साळवी, राहुल पंडित, सचिन करमरकर, अतुल नागवकेर, पराग तोडणकर असे अनेक जण आहेत.

दरवर्षी 7 ते 20 किमीचा वेगवेगळा टप्पा घेतला जातो. यंदा वडझल ते फलटण हा टप्पा केला. माउलींच्या आरतीनंतर रत्नागिरीत आलो. वारीमध्ये माउली ग्रुपकडून यशाशक्ती अन्नदान व मदत करतो. आता माउली ग्रुपकडून माहिती घेऊन अनेकजण आपापल्या सोयीने वारीत सहभागी होऊ लागले आहेत. ज्ञानेश्‍वर माउली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिरात माउली ग्रुपतर्फे तीन दिवस कार्यक्रम आयोजित करतो, असे हेळेकर म्हणाले.

“मी 14 वर्षे वारीला जातोय. पहिली 8 वर्षे वारी करायचो. गेली 6 वर्षे आळंदी संस्थानमध्ये स्वयंसेवक म्हणून सेवा करतोय. माउलींच्या पालखीसोबत राहणे, वाहन चालवणे अशी जी कामे येतील ती करतो. वारीच्या गोष्टी सांगायला वेळ पुरणार नाही, पण वारी ही प्रत्येकाने अनुभवण्याची गोष्ट आहे. एकदा वारी केली की पुढच्या वर्षी तो माणूस वारी करतो.”
- राजा केळकर

Web Title: saathchal wari from 17 years with the blessings of mauli