"पहिली सुरक्षा, नंतर परीक्षा'  `यांनी` केली मागणी

Safety First Then Examination Maharashtra Health University Students Demand
Safety First Then Examination Maharashtra Health University Students Demand

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षेबाबत तातडीने निर्णय घेऊन या परीक्षा रद्द करण्याची विनंती नाशिक विद्यापीठाच्या कुलगुरूंना निमा महाराष्ट्र स्टूडंन्ट फोरमच्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने लेखी निवेदनाद्वारे केली आहे. "पहिली सुरक्षा, नंतर परीक्षा' अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. जर आपण सुरक्षेची हमी देत नसाल तर परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. 

या निवेदनाच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक मंडळ, आयुर्वेदा संचालक, आयुर्वेद अधिष्ठाता यांना पाठविल्या आहेत. महाराष्ट्र स्टूडंट फोरमने पाठवलेल्या निवेदनामध्ये, कोविड-19 च्या वैश्‍विक महामारीमुळे देशात 2 महिन्यापासून लॉकडाऊन आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून राज्यात सर्वांत जास्त कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहे.

अशा परिस्थितीमध्ये सर्व आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत; परंतु कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी चिंताग्रस्त झालेले आहेत. कारण अद्यापही विद्यापीठाने परीक्षेसंदर्भात परीक्षा घेणार अथवा नाही याबद्दल विद्यार्थ्यांना कल्पना दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची तसेच पालकांची संदिग्ध अवस्था झालेली असून चिंता वाढली आहे. 

स्टूडेंट फोरम, राज्याने राज्यातील आयुर्वेद तसेच इतर वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला आहे. हा संवाद साधताना विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भात निमा स्टुडंट फोरम, महाराष्ट्र राज्याकडे काही मागण्या केल्या आहेत. त्या सर्व मागण्या लेखी निवेदनाद्वारे सादर केल्या आहेत. 

परीक्षेच्या 30 दिवस अगोदर वेळापत्रक येणे आवश्‍यक आहे. विद्यार्थी लॉकडाऊन काळात गावाकडे असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुस्तके उपलब्ध नाहीत अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत ऑनलाईन पुस्तकांची व्यवस्था करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करता येईल, अशी मागणीही राज्यातील वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने स्टुडन्ट फोरमचे अध्यक्ष डॉ. श्रीराम रगड, सचिव डॉ. राहुल राऊत आणि कोषाध्यक्ष डॉ. वसिम इनामदार यांनी केली आहे. 

अशा आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या 
मागण्यांमध्ये वैद्यकीय शाखेच्या सर्व विद्याथ्यांची परीक्षा होणार असेल तर वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी सोशल डिस्टन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे पाळावयाचे आहेत? तसेच परीक्षा केंद्रावर काय सुरक्षा देणार आहात? यांसदर्भात विद्यापीठाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर एकत्रित केल्यानंतर परीक्षेला बसण्यापूर्वी परीक्षा केंद्र निरर्जंतुक करणे, विद्यार्थ्यांना एन-95 मास्क, पीपी कीट उपलब्ध करून देणार आहात काय? लॉकडाऊनच्या काळात सध्या बरेचसे विद्यार्थी गावाकडे गेलेले आहेत त्यांना परीक्षेला येण्यासाठी प्रवास करावा लागणार आहे. त्यावेळी काही विद्यार्थी रेड झोनमधून आले तर त्यांना क्‍वारंटाईन करावे लागणार आहे अथवा नाही तसेच प्रवासादरम्यान एखादा विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यास त्यास जबाबदार कोण? यासंदर्भात मार्गदर्शक सूचना महाविद्यालयास द्यावात.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com