राजापूर किनारपट्टीवर सीगलचे थवे

राजेंद्र बाईत
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

राजापूर - तालुक्याच्या पश्‍चिम किनारपट्टीवर परदेशी पाहुणे (सीगल पक्षी) अवतरले असून या पाहुण्यांनी किनारपट्टीवर मुक्काम ठोकला आहे. लडाख प्रदेशामध्ये आढळणारा सीगल पक्षी येथील किनारपट्टीवर आला आहे. लालभडक चोच, पांढर्‍या शुभ्र पिसांनी वेढलेले शरीर अशा आकर्षक असलेल्या या सिगल पक्ष्याच्या थव्यांनी तालुक्याची पश्‍चिम किनारपट्टी फुलून गेली आहे.

लडाख प्रदेशामध्ये आढळणारा सीगल थंडीच्या कालावधीमध्ये तालुक्याच्या किनारपट्टीवर येतो. थंडीच्या कालावधीमध्ये लडाखमध्ये मोठ्याप्रमाणात पडणार्‍या बर्फामुळे या पक्ष्यांना पुरेसे खाद्य मिळत नाही. त्यामुळे खाद्य आणि वास्तव्याला अनुकूल असलेल्या परिसरात सिगल काही कालावधीसाठी स्थलांतरित होतात. तालुक्यातील वेत्ये, आंबोळगड, नाटे आदी परिसरामध्ये हे पक्षी मोठ्या संख्येने आले आहेत. या पक्षाच्या हवेतील सहजसुंदर कसरती पाहण्यासाठी अनेकांची पावले समुद्र किनार्‍यावर वळू लागली आहेत. 

राजापूर तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर सिगल पक्ष्याचे आगमन झाले आहे. थंडीची चाहूल लागताच सिगल पक्षी या किनाऱ्यावर येतात. सकाळी सात ते बारावाजेपर्यंत किनारी असतात. वाळू तापली की समुद्रात पाण्यावर बसतात. दुपारी तीन वाजता परत किनारी येतात. सूर्यास्तनंतर पुन्हा समुद्रात पाण्यात जातात.

- धनंजय मराठे, पर्यावरण अभ्यासक

दृष्टीक्षेपात सीगल पक्षी

लालभडक चोच, पांढरे शुभ्र पिसांचे आकर्षक आणि देखणे शरीर असलेल्या सीगल पक्षाच्या जगामध्ये सुमारे 9 हजार प्रजाती आहेत. त्यापैकी सुमारे 1225 प्रजाती भारतामध्ये आढळतात. थंडीच्या कालावधीमध्ये मुबलक खाद्य आणि समागम करण्यासाठी अनुकूल असलेल्या प्रदेशामध्ये हे पक्षी स्थलांतरीत होतात. समागमानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये अंडी घालण्यासाठी पुन्हा मायदेशी परतात. स्थलांतरित होणारे पक्षी सुमारे पंधरा हजार किमीचे अंतर साधारणपणे तीन महिन्यात ताशी 20 ते 25 किमीच्या वेगाने कापतात. 

Web Title: Sagal swan at Rajapur coast