Sakal Impact : अखेर गोव्याने आपल्या राज्यात प्रवेश दिलाच..

sakal impact Goa entered our state
sakal impact Goa entered our state

बांदा (सिंधुदुर्ग) :  गेले अडीच महिने लॉकडाऊनमुळे सिंधुदुर्गात अडकलेल्या व गोव्यात विविध खासगी कंपन्यांमध्ये काम करणार्‍या मुला-मुलींना अखेर गोव्याने आपल्या राज्यात प्रवेश दिला आहे. त्यांची दोन हजार रुपये घेऊन म्हापसा येथील सरकारी रुग्णालयात कोरोना टेस्ट घेण्यात आली. अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना तात्काळ कामावर रुजू करून घेण्यात येणार आहे. ‘सकाळ’ने या प्रश्‍नाला वाचा फोडली होती. 

लॉकडाऊन नंतर गोव्यात कामाला असलेले सिंधुदुर्गातील अनेकजण जिल्ह्यात होते. तिकडे त्यांच्या कंपन्या हळूहळू सुरू झाल्या; मात्र त्यांना पुन्हा गोव्यात प्रवेश मिळत नव्हता. गोवा सरकारच्या विविध निकषामुळे ही स्थिती ओढवली होती. या तरुणांच्या नोकर्‍या जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त दिले. त्याची दखल घेवून विविध लोकप्रतिनीधींनी गोवा सरकारशी चर्चा केली. जिल्हा प्रशासनही सक्रीय झाले. सकाळने या विषयाचा सतत पाठपुरावा केला. या सगळ्याचे फलीत म्हणून आता गोवा प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे; मात्र अजुनही या तरुणांना वैयक्तीक 2 हजार रूपये भरून कोरोना टेस्ट करून घ्यावी लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com