सिंधुदुर्गात आतापर्यंत सरासरी 546 मिमी पाऊस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला असल्यामुळे गेल्या चोवीस तासात सरासरी 15.50 मिलीमीटर पाऊस पडला आहे. आतापर्यंत एकूण 546.10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 1 जूनपासून पावसाने सुरवात केली असली तरी नदीनाल्यांना पूर, रस्त्यावर पाणी चढून वाहतूक बंद अशी स्थिती उद्भवण्यासारखा जोरदार पाऊस अद्याप झालेला नाही.

सिंधुदुर्गनगरी- जिल्ह्यात पावसाने जोर धरला असल्यामुळे गेल्या चोवीस तासात सरासरी 15.50 मिलीमीटर पाऊस पडला आहे. आतापर्यंत एकूण 546.10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 1 जूनपासून पावसाने सुरवात केली असली तरी नदीनाल्यांना पूर, रस्त्यावर पाणी चढून वाहतूक बंद अशी स्थिती उद्भवण्यासारखा जोरदार पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे अनेक तालुक्यात अद्यापही पिण्याच्या पाण्याच्या विहीरी पाण्याने भरलेल्या नाहीत.

जिल्ह्यात शेतीच्या कामांना सुरवात झाली आहे. रविवारचा दिवस पावसाने विश्रांती घेतली असली तरी आज सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा जोर वाढलेला दिसत असून जिल्ह्यात आतापर्यंत 11 घरे व 1 गोठा बाधीत होवून सुमारे आठ लाखाहून अधिक नुकसान झाल्याची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय पाऊस
तालुकानिहाय चोवीस तासातील व कंसात आत्तापर्यंतचा पाऊस मिलीमीटरमध्ये असा-
दोडामार्ग-1 (646), सावंतवाडी-10 (578), वेंगुर्ले-10.01 (662.83), कुडाळ-35 (506), मालवण-6 (609), कणकवली-14 (544), देवगड-21 (537), वैभववाडी-27 (286).

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या

विश्वास नांगरे पाटील यांची पालखीमार्गावर सायकल वारी

बाळाचा जीव घेऊन त्या मातेवर अत्याचाराचा प्रयत्न; महिला गंभीर

मुंबईत आणखी एका अभिनेत्रीची आत्महत्या

भिडेंवर गुन्हा दाखल; पालखी मार्गात बेकायदा जमाव व घोषणाबाजी

डोंबिवलीत पालिकेच्या स्मशानभूमीत वाहतोय 'मद्याचा महापूर'

बिहारचे राज्यपाल कोविंद 'एनडीए'चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार

Web Title: sakal news sindhudurg news rain news

टॅग्स