संगमेश्‍वर तालुक्यातील ६० साकव धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

दुरुस्तीचा प्रस्ताव धूळ खात - येणार का जाग?

देवरूख - गतवर्षी तालुक्‍यातील तामनाळे येथे कोसळलेला लोखंडी साकव आणि सोमवारी (ता. १३) कळंबुशी गावात लोखंडी साकव कोसळून झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील ६० साकव धोकादायक स्थितीत आहेत. त्यांची दुरुस्ती करणे आवश्‍यक असूनही शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

दुरुस्तीचा प्रस्ताव धूळ खात - येणार का जाग?

देवरूख - गतवर्षी तालुक्‍यातील तामनाळे येथे कोसळलेला लोखंडी साकव आणि सोमवारी (ता. १३) कळंबुशी गावात लोखंडी साकव कोसळून झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील ६० साकव धोकादायक स्थितीत आहेत. त्यांची दुरुस्ती करणे आवश्‍यक असूनही शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

तालुक्‍यातील सर्वच जुने साकव जीर्ण झाले असून यावरून ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक वर्षे या साकवांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे साकव मोडकळीस आल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत धरून त्यावरून प्रवास करावा लागत आहे. चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मोडकळीस आलेल्या साकवांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव ग्रामपंचायतींकडे मागवले होते. तालुकाभरातून ६० साकवांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले; मात्र दुरुस्तीसाठी निधीच उपलब्ध न झाल्याने हे प्रस्ताव पडून आहेत. त्यानंतर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे एप्रिल २०१३ मध्ये जिल्हा परिषदेने साकव दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला होता. तीन वर्षे उलटली तरी हा प्रस्ताव धूळ खात पडून आहे. 

गतवर्षी नजीकच्या तामनाळे गावात दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी पालखी घेऊन निघालेले भाविक लोखंडी साकवावर आले असता हा साकव मध्यभागी तुटून थेट ३० फूट खोल नदीत कोसळला. या दुर्घटनेत ७ जण गंभीर, तर १३ जण जखमी झाले होते. यापाठोपाठ सोमवारी (ता. १३) कळंबुशी गावात साकव कोसळून १९ भाविक जखमी झाले. या दोन अपघातांनंतर ग्रामीण भागात असणाऱ्या धोकादायक साकवांच्या दुरुस्तीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

धामणी गावातच ५ साकव असून असावी नदीवरून पलीकडच्या वाडीत जाण्यासाठी हे साकव बांधण्यात आले आहेत. यातील काही साकवांचा नियमित वापर सुरू आहे, तर काही साकवांना जोडरस्ताच नसल्याने ते वापराविना पडून आहेत. एका साकवाला तर लोखंडी शिड्या बसविण्यात आल्या आहेत.

Web Title: sakav danger in sangameshwar tahsil