डेगवेत अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

सकाळी अकराच्या सुमारास दोडामार्गावरील डेगवे येथे जंगलातून सांबराने रस्त्यावर उडी घेतली. याच दरम्यान दोडामार्गहून बांद्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू वाहनाची जोरदार धडक बसून सांबर रस्त्यावर आदळल्याने जखमी झाले

बांदा - बांदा-दोडामार्गावरील डेगवे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यु झाला. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली.

सुमारे आठ वर्षांचे नर जातीचे सांबर अचानक गाडीच्या आडवे आल्याने वाहनाची धडक बसली असल्याचा अंदाज ग्रामस्थांनी वर्तविला. वनविभागातर्फे घटनास्थळी धाव घेत मृत सांबराला ताब्यात घेत शवविच्छेदन करून दहन करण्यात आले.

येथील डेगवे भागात मोठे जंगल असल्याने रानटी प्राण्यांचा वावर आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास दोडामार्गावरील डेगवे येथे जंगलातून सांबराने रस्त्यावर उडी घेतली. याच दरम्यान दोडामार्गहून बांद्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू वाहनाची जोरदार धडक बसून सांबर रस्त्यावर आदळल्याने जखमी झाले. यात सांबराच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे वनविभागातर्फे सांगण्यात आले.
अपघाताचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी सांबर पाहण्यासाठी डेगवे येथे गर्दी केली.

सावंतवाडी वनविभागाचे वन सहायक निरीक्षक सुभाष पुराणिक, वनक्षेत्रपाल विजयकुमार कदम, बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर, अमित कटके, वनमजूर रमेश पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मृत सांबराला सावंतवाडी येथे आणले. सांबर हे नर जातीचे असून ते आठ वर्षांचे असल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी वर्तविण्यात आला.

Web Title: Sambar Deer killed in accident

टॅग्स