रायगडावरील सिंहासनासाठीच चिपळूणात भिडेंची सभा

नागेश पाटील
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

चिपळूण - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेंच्या सभेस विविध संघटनांचा प्रखर विरोध असतानाही चिपळुणात सभा झाली. भिडेंना प्रचंड पोलिस संरक्षण मिळाल्याने सभा यशस्वी झाली. भिडेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, देशावर झालेली परकीय आक्रमणे, त्यानुसार आपण कसे वागावे, याचे विविध दाखले दिले. यात कोणताही जातीय तणाव निर्माण करण्याचा हेतू नसल्याचा दावा आयोजकांनी केला. 

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे 32 मण सोन्याचे सिंहासन करण्याचा प्रयत्न शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सदस्यांनी सुरू ठेवला आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी चिपळुणातील चिंतळे मंगल कार्यालयात भिडेंच्या सभेचे आयोजन केले होते. जानेवारी आणि एप्रिलमध्ये भिडेंची बैठक संवेदनशील स्थिती निर्माण झाल्याने रद्द झाली. प्रामुख्याने भिडेंनी मार्गदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे अनेक दाखले दिले. त्याचे वागणे, त्यावेळच्या चालीरीती, संभाजी महाराजांचा पराक्रम कथन केला. धारकर्‍यांजवळ सुवर्णसिंहासनाविषयी चर्चा केली. त्यासाठी 2 हजार लोकांची यादी बनविण्याची सूचना केली. बैठकीस विविध तालुक्यातून धारकरी सदस्य उपस्थित होते.

प्रखर विरोधामुळे 5.45 ला बैठक

बुधवारची (ता.22) नियोजित 4 वाजताची बैठक प्रखर विरोधामुळे 5.45 ला सुरू झाली. भिडेंना पोलिस फौजफाट्यात सभेच्या ठिकाणी नेण्यात आले. भिडेंचे व्याख्यान रात्री 9.10 ला संपले. संवेदनशील स्थितीमुळे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडेंनी भ्रमणध्वनीवरून बैठक थांबविण्याची विनंती केली, तरी ती सुरू राहिली होती. 

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे 32 मण सोन्याचे सिंहासन करण्याविषयी चर्चा करण्यासाठी ही बैठक होती. यापूर्वीच्या दोन बैठका रद्द झाल्याने बुधवारी बैठक झाली. भिडेंनी शिवचरित्र व सिंहासन उभारणीसंदर्भात मार्गदर्शन केले. 

- देवव्रत तांबे, धारकरी सदस्य

Web Title: Sambhaji Bhide meeting in Chiplun