संभाजी महाराज महाराष्ट्राचे सर्वोत्तम राजे - श्रीनिवास पेंडसे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

रत्नागिरी - राज्यकारभार हाती घेतल्यानंतर १६८० ते १६८९ या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत धर्मवीर संभाजी महाराज एकही लढाई हरले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकत मराठी साम्राज्याचा दसपटीने विस्तार केला. त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला सर्वोत्तम राजा मिळाला. त्या वेळी गोवा, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, मद्रास, आंध्र प्रदेश या ठिकाणी मराठी साम्राज्य विस्तारले, असे स्पष्ट मत इतिहास अभ्यासक श्रीनिवास पेंडसे यांनी व्यक्त केले.

महाराजांच्या निधनानंतर १२२ वर्षांनंतर त्यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाला. कोणतेही तथ्य नसलेल्या या मजकुराला इतिहासात कोणताही आधार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे बलिदान मासानिमित्त मारुती मंदिर येथे रविवारी (ता. ५) रात्री श्री. पेंडसे यांचे व्याख्यान झाले.

औरंगजेबाने दिल्लीमध्ये महाराजांना बोलावले, तेव्हा शंभुराजे ८ वर्षांचे होते व त्यांच्यासमवेत गेले होते. त्या वेळी महाराजांना नजरकैदेत ठेवले, पण शंभुराजांना त्यांनी सांगितले दिल्लीच्या वेशीवर महाराष्ट्रातील एक कुंभार आहे, त्याच्याशी ओळख काढून गाढवं खरेदी कर. त्यानंतर काही महिन्यांतच महाराजांनी हातावर तुरी दिली. शंभुराजांना लहानपणापासून असे राजनीतीचे धडे मिळाले.

शंभूराजांनी गुजरातमध्ये वयाच्या दहाव्या वर्षी पहिली लढाई केली. याची नोंद फ्रेंच पर्यटक ॲबेकॅरे याने ‘युद्धसन्मुख राजा’ अशी केली. शंभूराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी ‘बुधभूषण’ हा राजनीतीवर मार्गदर्शक असा जो संस्कृत ग्रंथ लिहिला त्याच्या गोष्टी सांगितल्या. त्रिचनापल्लीचा (तमिळनाडू) कावेरीचे विस्तीर्ण पात्र आणि समोरील पाषाणकोट किल्ल्यापलीकडे शत्रू दिसत नसतानाही बाणाला स्फोटके लावून जय मिळवला. देशाच्या इतिहासात पहिला तरंगता आरमारी तोफखाना, पहिला सागरी सेतू बांधणारा आणि युद्धकाळात ३० दिवसांत सैनिकांना चिलखत पुरवणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी अशा शब्दांत पेंडसे यांनी गौरव केला. १६८२ मध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा दुष्काळ पडला तरीही महाराजांच्या या कारकिर्दीत एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद नसल्याचे ते म्हणाले. या वेळी मारुती मंदिर देवस्थाचे सुभाष वैद्य, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष राकेश नलावडे यांच्यासह धारकरी, रत्नागिरीकर उपस्थित होते.

Web Title: Sambhaji Raje best of Maharashtra