वेंगुर्ले तालुक्यात चंदन लाकडासह मृत कासव जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

वेंगुर्ले - तालुक्यातील मातोंड येथील वनविभागाच्या जंगलात काही दिवसांपूर्वी वनविभागाने कारवाई केल्यानंतर आता  आज (शुक्रवारी) शहरातील कॅम्प म्हाडा कॉलनी व आदिवासी वस्तीत धाड टाकून चंदन लाकडासहित जिवंत व मृत कासव असे मिळून ३ लाख २८ हजार ४०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

वनक्षेत्रपाल फिरते पथक सावंतवाडी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. कॅम्प म्हाडा कॉलनी येथील अजित गावडे यांच्या घरी १७.५५४ की ग्रॅम चंदन तसेच ६.७०५ की ग्रॅम चंदनाची साले असा मिळुन ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर वेंगुर्ले कॅम्प येथे वास्तव्यास असलेल्या कातकरी समाजाच्या ६ झोपड्या तर १ चिरेबंदी घराची झडती घेतली असता. यातून ७.४१४ की ग्रॅम चंदन साली, ९ जिवंत कासव, ७५ मृत कासवंचे अवशेष, शिकारीसाठी वापरलेले २ तिरकामटे, बाण, कोयता असे मिळून २ लाख ८८ हजार ४०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी येथील अजित गणपत गावडे, मयूर विजय आंगचेकर, गणेश अनंत गिरी, सुरेश जयराम पवार, चंदू जयराम पवार, शिवाजी तुकाराम पवार, राजू अर्जुन पवार यांना अटक करण्यात आली असून त्यांना उद्या कुडाळ कोर्टात हजर करण्यात येणार आहेेेत. 

Web Title: Sandal wood and dead tortoise seized in Vengulre tauka