भाजपमधून हकालपट्टी केलेले पारकर, रावराणे, प्रभूगावकर सेनेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा बॅंकेचे संचालक दिगंबर पाटील यांच्यासह भाजपचे नेते अतुल रावराणे, जि. प. माजी अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल, वैभववाडी सभापती लक्ष्मण रावराणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

कणकवली - कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा बॅंकेचे संचालक दिगंबर पाटील यांच्यासह भाजपचे नेते अतुल रावराणे, जि. प. माजी अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल, वैभववाडी सभापती लक्ष्मण रावराणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. यामुळे आता जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. 

Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्र्यांनी कोकणात शिवसेनेवर टाळली टिका 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरे यांच्या आज कणकवली आणि सावंतवाडी येथे जाहीर सभा झाल्या. विशेष म्हणजे कणकवलीच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्कंठा शिवसैनिकांना होती. तत्पूर्वी जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळींचे पक्षप्रवेश झाले.

Vidhan Sabha 2019 : कणकवलीत उद्धव ठाकरे यांची राणेवर आगपाखड

दरम्यान, याचबरोबर शिक्षण क्षेत्रात काम करणारे फोंडाघाट येथील नामदेव मराठे, विलास कोरगांवकर, दिपक सांडव, गिरीधर रावराणे यांनी श्री. ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेशासाठी विविध भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने व्यासपीठाच्या डाव्या बाजूला बसविण्यात आले होते; मात्र वेळेअभावी प्रमुख नेतेमंडळींनाच शिवबंधन बांधण्यात आले.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोकणातील जनतेचा जाहीरनामा

थेट व्यासपीठावर
भाजपमधून हकालपट्टी केल्याने श्री. पारकर, श्री. रावराणे आणि श्री.पटेल हे थेटपणे व्यासपीठावर दाखल झाले होते. गेले काही दिवस ते शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करत होते. काँग्रेससोबत नारायण राणे असताना ज्यांना जि.प.चे अध्यक्षपद देण्यात आले होते, असे प्रभूगावकरही शिवसेनेत दाखल झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sandesh Parker, Atul Raorane, Prabhugavkar enters in Shivsena