ग्रामीण महिलांसाठी पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन्स ‘सखी’ - हर्षदा पटवर्धन

मकरंद पटवर्धन
शनिवार, 31 डिसेंबर 2016

रत्नागिरी - महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये आरोग्याच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी लक्षात आल्यानंतर प्रा. हर्षदा पटवर्धन यांनी गेले वर्षभर त्याचा अभ्यास करून सॅनिटरी नॅपकिनचे उत्पादन सुरू केले आहे. हे नॅपकिन पर्यावरणपूरक असून त्यात प्लास्टिकचा अत्यल्प वापर आहे. त्यामुळे त्याची योग्य विल्हेवाट लावता येते. या नॅपकिनमध्ये रसायने, कृत्रिम सुवास, प्लास्टिक नाही. यामुळे आरोग्याला अपाय होत नाही, असा दावा केला आहे. अशा तऱ्हेचा हा जिल्ह्यातील पहिला प्रकल्प आहे. नॅपकिनचे ब्रॅंडिंग सखी असे केले आहे.

यासंदर्भात ग्रामीण भागात महिलांमध्ये जनजागृती करणे व महिला बचत गटांना नॅपकिनच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्याचा त्यांचा मानस आहे. जानेवारीपासून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

स्त्रियांकरिता स्वच्छता, आरोग्य महत्त्वाचे आहे. मासिक पाळीवेळी वापरले जाणारे सॅनिटरी नॅपकिन शहरी भागांमध्ये जास्त प्रमाणात वापरले जातात; पण ग्रामीण भागात ते परवडत नाहीत, गावातील दुकानात उपलब्ध नसतात, शिवाय काही समजुती आणि पारंपरिक दबाव यामुळे उघडपणे दुकानात ते मागायला संकोच वाटतो. शिवाय याचे फायदे माहीत नसल्याने विद्यार्थिनी व त्यांच्या महिला पालक ते वापरत नाहीत. परिणामी याबाबत जागृतीपेक्षा अज्ञानच अधिक आहे, असे निरीक्षण प्रा. पटवर्धन यांनी नोंदले.
शहरातील खालची आळी येथे याचे उत्पादन केले जाते. विभा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चार महिला काम करतात. डी-फायबरिंग मशीनमध्ये वूडपल्प पिंजून घेतला जातो. त्यानंतर तीन ते पाच ग्रॅम पल्प ठराविक आकारात ॲब्सॉर्व्ह टिश्‍यू पेपर, प्लास्टिक आवरण, गोंद लावून प्रेस मशीनमध्ये प्रेस करून घेतला जातो. त्यानंतर एक आवरण ठेवून सीलिंग मशीनमध्ये ठराविक तापमानात प्रक्रिया केली जाते व शेवटी अल्ट्रा व्हायलेट मशीनमध्ये निर्जंतुकीकरण करून पॅकिंग केले जाते. ही सर्व मशीनरी रत्नागिरीमध्येच तयार केली असून यासाठी सुमारे साडेचार लाख रुपये खर्च केला आहे.

उत्पादनखर्च कमी केला
सौ. पटवर्धन या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. सहकारी व मैत्रिणींशी झालेल्या चर्चेतून नॅपकिनची समस्या समोर आली. गेले वर्षभर त्यांनी मुंबई, बडोदा येथील सॅनिटरी नॅपकिनच्या युनिटला भेट दिली; मात्र तेथील मशिनरी दीड कोटीची आहे. हे कमी साधनसामग्रीमध्ये व कमी उत्पादनखर्चात कसे करता येईल, याचा अभ्यास करताना त्यासाठी कोणते साहित्य वापरावे याचाही शास्त्रीय विचार त्यांनी केला. १६ नोव्हेंबरला उत्पादन सुरू केले. आठ प्रकारचे नॅपकिन्स बनवले जातात. रुग्णालये, मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांकडूनही या नॅपकिनला मागणी आहे.

Web Title: Sanitary napkins for women