नगराध्यक्षपदी संजय चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

वैभववाडी - वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी संजय चव्हाण, तर उपनगराध्यक्षपदी संपदा राणे यांची निवड झाली आहे. काँग्रेसच्या उमेदवारांना नऊ, तर भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांना सात मते मिळाली. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्‍यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.

वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाची निवडणूक प्रकिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातंधिकारी नीता शिंदे-सावंत यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी तहसीलदार संतोष जाधव, मुख्याधिकारी सचिन बोरसे आदी उपस्थित होते.

नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संजय चव्हाण यांनी नामनिर्देशनपत्र भरले होते. उपनगराध्यक्षपदाकरिता संपदा शिवाजी राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप-शिवसेना युतीकडून नगराध्यक्षपदासाठी सुचित्रा कदम तर उपनगराध्यक्षपदाकरिता सुप्रिया तांबे यांनी अर्ज भरला होता. दरम्यान सुरुवातीला नगराध्यक्षपदाकरिता मतदान घेण्यात आले. काँग्रेसच्या संजय चव्हाण यांना ९ मते मिळाली तर भाजपच्या सुचित्रा कदम यांना ७ मते मिळाली. श्री. चव्हाण हे दोन मतांनी निवडून आले. त्यानंतर उपनगराध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. काँग्रेसच्या उमेदवार संपदा राणे यांना ९ मते तर भाजपच्या सुप्रिया तांबे यांना ७ मते मिळाली सौ. राणे दोन मतांनी निवडून आल्या. दोन्ही विजयी उमेदवारांची घोषणा प्रांतधिकारी निशा शिंदे यांनी करताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. नगराध्यक्ष संजय चव्हाण आणि उपनगराध्यक्ष संपदा राणे यांचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, बांधकाम सभापती दिलीप रावराणे यांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले. यावेळी सभापती शुभांगी पवार, उपसभापती दिगंबर मांजरेकर, माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, नासीर काझी, अरविंद रावराणे, विश्राम राणे, हुसेन लांजेकर, शिवाजी राणे, बाळा हरयाण, अक्षता जैतापकर, अंबाजी हुंबे, दीपा गजोबार, समिता कुडाळकर, संजय गुरव आदी उपस्थित होते.

Web Title: Sanjay Chavan news Mayor