राजापूर उपनगराध्यक्षपदासाठी संजय ओगले यांचे नाव चर्चेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

राजापूर - येथील नगरपालिकेतील पाच महिने रिक्त असलेल्या उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर झाली असून शनिवारी (ता. २) निवडणूक होणार आहे. सतरा नगरसेवक संख्या असलेल्या पालिकेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला भाजपची साथ असल्यामुळे आघाडीचे पारडे निवडणुकीत जड राहणार आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय ओगले यांचे नाव सध्या आघाडीवर आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणीमध्ये अवैध ठरल्याने हनिफ काझी यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नगराध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून ॲड. जमीर खलिफे यांनी बाजी मारली होती. नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर खलिफे यांनी उपनगराध्यक्षपदाचा जुलै २०१८ मध्ये राजीनामा दिला होता.

तेव्हापासून उपनगराध्यक्षपद रिक्त आहे. त्यासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी शनिवारी (ता. २) दुपारी १२ वाजता विशेष सभा होणार आहे. सतरा नगरसेवक संख्या असलेल्या पालिकेमध्ये काँग्रेसचे सात, शिवसेना आठ, राष्ट्रवादी आणि भाजपाचे प्रत्येकी एक असे राजकीय संख्याबळ आहे. या संख्याबळाचा विचार करता पालिकेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादाची असलेली आघाडी आणि त्याला भाजपने दिलेला पाठिंबा पाहता निवडणुकीत आघाडीचे पारडे जड मानले जात आहे.

आघाडीकडून राष्ट्रवादीचे ओगले यांना संधी दिली जाणार, की आघाडीला साथ देणाऱ्या भाजपचे गोविंद चव्हाण यांना संधी मिळणार, याकडे लक्ष आहे.

शिवसेना लढणार की माघार?
पालिकेमध्ये शिवसेना विरोधी बाकावर असून नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीतून शिवसेनेने माघार घेतली होती. त्यामुळे उपनगराध्यक्षपदाची निवडणूक शिवसेना लढविणार का, याकडे लक्ष आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Ogale in Rajapur corporation subhead race