Vidhan Sabha 2019 : दापोलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे 'यांना' उमेदवारी 

Vidhan Sabha 2019 : दापोलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे 'यांना' उमेदवारी 

दाभोळ - गेल्या 20 ते 25 वर्षात बहुजन समाजाचा विकास व्हावा,यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीने प्रयत्न केले नसून आपण व्यक्‍ती विकासावर भर देणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष खोपकर यांनी दापोलीत पत्रकार परिषदेत दिली. 

वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रात 288 जागांवर उमेदवार उभे करण्याचे निश्‍चित केले असून दापोली विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून संतोष खोपकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. प्रमुख कार्यकर्त्यांची दापोलीत बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये खोपकर म्हणाले, गेली 30 वर्षे या मतदार संघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे सूर्यकांत दळवी व राष्ट्रवादीचे संजय कदम यांनी केले. मात्र त्यांनी म्हणावा तसा या मतदारसंघाचा विकास केलेला नाही.

गावामध्ये रस्ते, पाणी, अन्य मूलभूत सुविधा दिल्या म्हणजे विकास होतो असे नव्हे तर या मतदारसंघात प्रमुख मुद्दा हा बेरोजगारीचा आहे.दापोली विधानसभा मतदारसंघात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी 1 हजार 250 कोटी रुपयांचा निधी आणला असे सांगितले जात असले तरी मतदारसंघामध्ये हे पैसे खर्च झाले नाहीत. रस्त्यांची दुरवस्था असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रात लक्षवेधी कामगिरी करत असून या विधानसभा निवडणुकीत आमचे उमेदवार प्रचंड संख्येने निवडून येतील, असा विश्‍वास आहे. आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री बनविण्याचे आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे स्वप्न असून त्यादृष्टीने आमचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

4 ऑक्‍टोबरला कार्यकर्त्यांसमवेत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून निवडून आल्यानंतर या मतदारसंघामध्ये मत्स्य, काजू-आंबा या गोष्टींवर प्रक्रिया करणारे युनिट स्थापन करून बेरोजगारीचे निर्मूलन करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com