कुमारी माता झालेल्या तरुणीला समाजाने नाकारले अन्...

Sanvita Ashram Give Shelter To Mother And Her Child
Sanvita Ashram Give Shelter To Mother And Her Child

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - कुणाचाही आधार नसलेल्या तरुणीला आणि तिच्या बालकाला संविता आश्रमामुळे आजी - आजोबांसह अनेक नातेवाईक मिळाले; तसेच त्या नवजात बालकाचा नामकरण विधीही शहरालगतच्या गोपुरी आश्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला. 

अनैतिक संबंधातून कुमारी माता झालेल्या एका तरुणीला समाज आणि नातेवाइकांनी स्वीकार करण्यास नकार दिला. आता आपणाला कुणाचा आधार मिळेल या विवंचनेत असलेल्या त्या तरुणीसह तिच्या नवजात बालकासाठी देवदूत बनले ते संविता आश्रम पणदूरचे संचालक संदीप परब. माता आणि बालकाचा सांभाळ आपण करू याची हमी देत श्री. परब यांनी बाळाला आणि त्याच्या आईला आपल्या आश्रमात आश्रय दिला. त्यानंतर रविवारी (ता. 8) कणकवली तालुक्‍यातील प्रतिष्ठित नागरिक आणि संविता आश्रम यांच्यावतीने त्या नवजात बालकाचा नामकरण विधी सोहळा गोपुरी आश्रम येथे थाटामाटात साजरा करण्यात आला. "साहस' असे नामकरण झालेल्या बालकाला शुभेच्छा आणि भेटवस्तू देण्यासाठी कणकवलीवासीयांनी गर्दी केली. तसेच त्या बालकाचे शिक्षण आणि करिअरसाठी मदत करण्याचीही ग्वाही दिली. 

संदीप परब यांचे कार्य आदर्शवत

परंपरा आणि धर्म या नावाखाली अनेक बालकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या अथवा नाकारणाऱ्या समाजाला ह्यातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. अनेक निराधारांना आधार देणारा संविता आश्रम आणि त्याचे संचालक संदीप परब यांचे कार्य आदर्शवत असल्याचे सांगत उपस्थितांनी परब यांचे कौतुक केले व या सामाजिक कार्यासाठी आभार मानले; तसेच त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com