इच्छुकांची भाऊगर्दी, पदाधिकाऱ्यांची मात्र कसरत ; शिवसेना, भाजपकडून फिल्डंग

sarpanch upsarpanch election in ratnagiri candidate ready to post
sarpanch upsarpanch election in ratnagiri candidate ready to post

रत्नागिरी : जिल्ह्यात सरपंच, उपसरपंच निवडणुकांची लगीनघाई सुरू झाली आहे. राजापूर, चिपळूण, मंडणगड, दापोलीत काही सरपंच, उपसरपंच निवडणूक झाली. उर्वरित निवडणुका मंगळवारी (ता. ९) आणि बुधवारी (ता. १०) होणार आहे. इच्छुकांची भाऊगर्दी असल्यामुळे राजकीय नेतमंडळींची कसरत सुरु आहे. रुसव्या फुगव्यांच्या गोंधळात भाजपला संधी मिळू नये, यासाठी शिवसेना सतर्क आहे.

जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींच्या नुकत्याच निवडणुका झाल्या असून तिथे सरंपच, उपसरपंच पदाच्या निवडी होणार आहेत. सोमवारी (ता. ८) राजापूर, चिपळूण, मंडणगडसह दापोली तालुक्‍यातील निवड प्रक्रिया पार पडल्या आहेत. त्यामध्येही शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. उर्वरित निवडींसाठी गेले आठ दिवस इच्छुकांनी फिल्डींग लावलेली होती. त्या-त्या मतदारसंघातील आजी-माजी आमदार, पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यांच्यावरच उमेदवार निवडीच्या जबाबदाऱ्या ठेवल्या होत्या.

महिला आरक्षण असले तरीही इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने जवळच्यांना संधी देण्यासाठी नेत्यांची कुचंबणा होत आहे. सोमवारी रात्रीपर्यंत अनेक ग्रामपंचायतींचे उमेदवार निश्‍चित झालेले नव्हते. रत्नागिरी तालुक्‍यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काही ग्रामपंचायतींमधील नवनिर्वाचीत सदस्यांबरोबर चर्चाही झाली. जिल्ह्याच्या दक्षिणेकरील राजापूर, लांजा, रत्नागिरी आणि संगमेश्‍वरात तीसहून अधिक ग्रामपंचायतींवर कमळ फुलवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. 

कोतवडेची निवड चुरशीची

मंगळवारी (ता. ९) होणाऱ्या निवडीत रत्नागिरी तालुक्‍यातील आगरनरळ, कोतवडे, चांदेराई, चवे, गणपतीपुळे, गावखडी, कशेळी, कासारी, हातखंबा, मिऱ्या, नांदिवडे, सोमेश्‍वर, नेवरे, चाफे, ओरी, सैतवडे, शिवारआंबेरे, वरवडे, उक्षी, वाटद, खेडशी, नाणीज, पाली, मजगाव, पावस, नाचणे, मिरजोळे, गोळप या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामध्ये कोतवडेमध्ये शिवसेना, भाजपचे समान सदस्य असून एक सदस्य परिवर्तन पॅनेलचा आहे. दोन्ही पक्षाकडून दावे केल्यामुळे ही निवड चुरशीची होणार आहे.
 

सर्वाधिक गोंधळ

नाचणे, मिरजोळे, सोमेश्‍वर या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक गोंधळ आहे. तालुक्‍यातील कोतवडे, काळबादेवी, सडामिऱ्या या भाजपकडील ग्रामपंचायती खेचून घेण्यासाठी शिवसेनेकडून फिल्डींग लावली जात आहे. भाजपकडूनही या ग्रामपंचायती राखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सोमवारी दिवसभर बैठकांसाठी नेत्यांची दमछाक झाली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com