राजन तेलींनी निष्ठेची भाषा शिकवू नये - सतीश सावंत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

कणकवली - राजन तेलींना विधान सभेचे तिकीट न मिळाल्याने 2010 ते जुलै 2014 पर्यंत राणे कुटुंबियामध्ये अफवा पसरविणे आणि त्यांच्याबाबत गैरसमज निर्माण करणे हे काम ते सुर्याजी पिसाळ म्हणून करत होते. त्यामुळे त्यांना राणेंची साथ सोडावी लागली. अशा तेलींनी मला निष्ठेची भाषा शिकवू नये अशी प्रतिटीका जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे.

येथील स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात बोलताना श्री. सावंत म्हणाले, ""तेली म्हणत असतील रविंद्र फाटकांचा पराभव झाला तेव्हा मी बाहेर पडायला सांगितले. मग 2009 च्या विधानसभा निकालानंतर 2014 पर्यंत तेली हे निष्ठावंत होते, मग त्यांनी माझ्या सांगण्याचा फायदा घेतला असता. मी सांगून तेली बाहेर पडले हे विधान हास्यास्पद आहे. मुळात फाटकांच्या पराभवानंतर राणे कुटुंबियांशी तेलींचे संबंध बिघडले. त्यानंतर पुण्यात जावून माफी मागितली; पण राणे कुटुंबियांबाबत अफवा परसविण्याचे त्यांनी काही सोडले नाही. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, सिंचन महामंडळ, आमदार, जिल्हा बॅंकेचे चेअरमनपद मिळूनही ते एकनिष्ठ राहू शकलेले नाहीत. तेली हे पक्षात असताना गटबाजीचे महागुरू होते. ज्या पक्षात जातील तेथे गटबाजीचा त्रास त्या पक्षाला होतो.''

ते म्हणाले, ""संचयनीबाबत आरोप केले आहे. त्या संचयनीच्या प्रकरणात मला गुंतविण्याचे काम तेलींनी पक्षात राहून केले. आता तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात तेथे चौकशी करून याप्रकरणात ठेवीदारांची मदत करू शकता; मात्र ठेवीदारांचे हीत न पाहता ते माझ्यावर आरोप करत आहेत. अशा तेलींवर जिल्ह्यातील जनता विश्‍वास ठवणार नाही. मला अडकविण्याचा तेलींनी प्रयत्न केला; पण काही महिन्यातच सत्यविजय भिसे खूनप्रकरणात तेली अडकले हा नियतीचा खेळ आहे.''

राजकारण्यांच्या कुंडल्या जनतेच्या हातात
राजकारणात असलेल्यांच्या कुंडल्या या जनतेच्या हातात असतात. म्हणूनच मी आंब्रड मतदार संघातून निवडून आलो. जिल्ह्यातील जनतेचा माझ्यावर विश्‍वास आहे. मी सामान्य शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. त्याची पोचपावती जनता देईल. माजी पद मिळविण्याची कार्यक्षमता आहे. माझे काम जनतेसमोर आहे. 
 
Web Title: Satish Sawant comment