पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मानसिकता बदलावी - सतीश सावंत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

सिंधुदुर्गनगरी - मुळात पालकमंत्री दीपक केसरकर यांनाच प्रशासन चालवायला जमत नाही. त्यामुळे त्यांनी अधिकारी वर्गावर खापर फोडण्यापेक्षा आपली मानसिकता बदलावी. जिल्ह्यातील जनतेच्या भल्यासाठी आमदार व मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी टीका जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. 

सिंधुदुर्गनगरी - मुळात पालकमंत्री दीपक केसरकर यांनाच प्रशासन चालवायला जमत नाही. त्यामुळे त्यांनी अधिकारी वर्गावर खापर फोडण्यापेक्षा आपली मानसिकता बदलावी. जिल्ह्यातील जनतेच्या भल्यासाठी आमदार व मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी टीका जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. 

सावंतवाडी महोत्सवाच्या उद्‌घाटनात केसरकर यांनी निधी आणूनही अधिकाऱ्यांच्या मानसिकतेअभावी कामे होत नसल्याची खंत व्यक्त केली होती. यावर बोलताना सावंत म्हणाले, ""पालकमंत्री केसरकर यांनी आपल्याला अधिकारी ऐकत नाहीत. नकारात्मक आहेत, असा आरोप करीत 2014 पासून आम्ही ओरड मारीत असलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब केले आहे. यापूर्वी केसरकर हे नारायण राणे यांच्यावर विकास करायला देत नाहीत, असा आरोप करीत होते. तेच आता अधिकाऱ्यावर खापर फोडीत आहेत.'' 

""जिल्हा नियोजन सभा होऊन तीन महिने उलटले तरी जिल्हा नियोजनच्या निधीचे वाटप केलेले नाही. जिल्हा परिषदेच्या कामांची यादी दिलेली नाही. सभेच्या इतिवृतावर स्वाक्षरी घेण्यासाठी केसरकर यांच्याकडे अधिकारी हेलपाटे मारीत आहेत. यावरून पालकमंत्री केसरकर यांना प्रशासनातील काही समजत नाही, हे स्पष्ट होत आहे. त्यांच्या फक्त पोकळ घोषणा व "मी निधी आणला' या वलग्नाच असतात.'' 

- सतिश सावंत 

केसरकर यांच्या एवढा निष्क्रिय पालकमंत्री जिल्ह्याला आतापर्यंत लाभलेला नाही. त्यामुळे नारायण राणे व त्यांची तुलना होऊ शकत नाही. आतापर्यंत राणे काम करू देत नाहीत असा आरोप केला. आता अधिकारी यांचे नाव घेतात. मुळात जिल्ह्यातील अधिकारी सकारात्मक आहेत. त्यांच्याशिवाय जिल्ह्याचा विकास होऊ शकत नाही. आपली निष्क्रियता झाकण्यासाठी पालकमंत्री केसरकर यांनी सुरु केलेले दोषारोप जिल्ह्यातील जनतेपुढे झाकले जाणार नाहीत, असाही आरोप सावंत यांनी केला. 

Web Title: Satish Sawant comment