सिंधुदुर्गवासीयांनो, किसान क्रेडीट कार्ड आहे? मग ही बातमी वाचाच

satish sawant press conference kisan credit card subject konkan sindhudurg
satish sawant press conference kisan credit card subject konkan sindhudurg

सिंधुदुर्गनगरी -  केंद्राच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत जिल्ह्यातील दुग्ध, कुक्‍कुटपालन शेळीमेंढी आणि मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्हा बॅंकेकडून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे जनावरांना लागणारे खाद्य, वैरण, चारा आदी साहित्य एकाच वेळी खरेदी करणे शक्‍य होणार आहे, असे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यासाठीचा सर्वे सुरू असून 1 जुलैपासून योजनेची अंमलबजावणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पशुसंवर्धन व्यवसायाच्या वाढीबाबत विचार विनिमय करण्यासाठी जिल्हा बॅंकेच्या वतीने काल ओरोस येथे गोकुळ दूध संघ, सर्व दूध सहकारी संस्थाच्या अध्यक्षांची बैठक झाली. या वेळी एम.के. गावडे, दिगंबर पाटील, नीता राणे, संग्राम प्रभुगावकर, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई आदी उपस्थित होते. 

या वेळी झालेल्या निर्णयांची माहिती श्री. सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. भात पिकासाठी शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने रक्कम दिली जाते. त्याच धर्तीवर दुग्ध, कुक्‍कुटपालन, शेळीमेंढी आणि मत्स्य व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबतच्या विषयावर चर्चा केली. या व्यवसायाला मदतीची आवश्‍यकता असल्याने किसान क्रेडिट कार्ड या केंद्राच्या योजनेंतर्गत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतल्याचे सावंत यानी सांगितले.

अशा पद्धतीची सुविधा देणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच जिल्हा बॅंक असल्याचेही श्री. सावंत यांनी स्पष्ट केले. स्थानिक गाय, म्हैशी, संकरित गाय, मुरा पंढरपुरी म्हैस, 500 पक्ष्यांचे कुक्‍कुटपालन, 10 शेळी 1 बोकड असा शेळीमेंढी गट व मत्स्य व्यवसायासाठी ही सुविधा उपलब्ध आहे. 25 जूनपर्यंत याबाबतचा सर्वे केला जाणार आहे. त्यानुसार 1 जुलैला बॅंकेच्या वर्धापन दिनापासून ही योजना अमलात आणली जाणार आहे. 

प्रतिभा डेअरीचा मुद्दा गाजला 
यापूर्वी शेतकऱ्यांकडील दूध संकलन करणाऱ्या कोल्हापूर येथील प्रतिभा दूध डेअरीकडून 2 कोटी 60 लाख रुपये येणे बाकी आहेत. ही थकबाकी न मिळाल्याने काहींनी वसुलीबाबत आग्रही भूमिका मांडली. त्यामुळे हे पैसे वसूल करून शेतकऱ्यांना मिळवून देण्याच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मतभेद विसरून प्रयत्न करण्याचे आवाहनही श्री. सावंत यांनी केले. दूध संघाचे चेअरमन याबाबत सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन लक्ष वेधणार असल्याचेही श्री. सावंत यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com