सांवतवाडीत 'ऑपरेशन मुस्कान' फत्ते

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

.'ऑपरेशन मुस्कान': पोलिस, होमगार्डच्या दक्षतेमुळे कोल्हापूरचे कुटुंब सुखरूप. मुले  दिली वडिलांच्या ताब्यात. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात राबविलेल्या "ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत 16 वर्षांखालील अल्पवयीन मुलांचा शोध व त्यांच्या पालकांकडे सोपविणे या प्रकारे मोहीम चालू आहे. याअंतर्गत आज येथे मूळ कोल्हापूर येथील हरविलेल्या 2 मुलांना कुडाळ येथे त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. रवी चंद्रकुमार मोती (वय 12) व त्याची बहीण दुर्गामा चंद्रकुमार मोती (वय 9), अशी त्या मुलांची नावे आहेत.
 
"ऑपरेशन मुस्कान' बाबत सूचना देऊन पोलिस व होमगार्ड कर्मचाऱ्यांना तालुक्‍यात तैनात केले आहे. त्यासंबंधी गस्तदेखील आज चालू होती. शहरात होमगार्ड गणेश जाधव हा येथील भारतमाता हॉटेलसमोर गांधी चौक येथे कर्तव्य बजावत असताना त्याला दोन लहान मुले घाबरलेल्या स्थितीत दिसली. 

 हेही  वाचा - बापरे! येथे महिन्याला होतात सात खून

 जाधव  यांनी प्रसंगावधान दाखवून केली मदत

बराचवेळ झाल्यावर ती मुले कोणाला तरी शोधत असल्याचे जाधव यांच्या लक्षात आले. त्याने त्यांच्याकडे विचारपूस करून माहिती घेतली तेव्हा त्यांनी आपल्यासोबत आजी होती; परंतु ती कुठे गेली हे माहिती नाही. आपण कोल्हापूर येथील असून, कुडाळ येथे वडिलांकडे जात असल्याचे सांगितले. यावरून जाधव यांनी प्रसंगावधान दाखवून तत्काळ मुस्कान टीमचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अमित गोते यांना माहिती दिली.

 हेही वाचा - #SaturdayMotivation मानसीचा चित्रकार तो...

पोलिसांच्या  मदत उपयोगी

काही वेळातच श्री. गोते व मुस्कान टीममधील कर्मचारी जागेवर पोहचले, तेथे टीममधील साध्या वेशातील महिला पोलिस कॉन्स्टेबल प्रणाली रासम यांनी त्यांच्याकडून आई-वडिलांची माहिती घेतली व त्यावरून त्यांचे वडील कुडाळला असल्याचे समजले. टीमने कुडाळ पोलिस ठाणे येथील पोलिसांच्या समन्वयाने वडिलांना संपर्क केला. 

 हेही वाचा - गर्ल्स... ब्री ब्रेव्ह ऍण्ड गो अहेड...! वू आर विथ यू

कुडाळ पोलिसांच्या ताब्यात मुले

शहरातील मायकल डिसोजा आणि सुरेश सावंत यांच्यासमोर पोलिसांनी त्या लहान मुलांना विश्‍वासात घेऊन खाऊ दिला आणि कुडाळ पोलिस ठाण्याकडे घेऊन गेले. सहायक पोलिस निरीक्षक योगेश जाधव यांनी पोलिस उपनिरीक्षक गोते, पोलिस कॉन्स्टेबल नवनाथ शिंदे व चालक पोलिस हवालदार मातोंडकर व महिला पोलिस कॉन्स्टेबल रासम यांना मार्गदर्शन करून पाठविले. कुडाळ पोलिसांच्या ताब्यात मुलांना दिले. पोलिस निरीक्षक शंकर तोरे यांनी मुलांचे वडील श्री. मोती यांना शोधून कायदेशीर बाबींची पूर्तता करून मुलांना ताब्यात दिले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savantwadi Operation Muskan Victory