१४ लाख लोकसंख्येसाठी जिल्ह्यात तीनच रक्तपेढ्या

प्रकाश पाटील
मंगळवार, 27 जून 2017

सावर्डे - रुग्णाला अकस्मात व शस्त्रक्रियेवेळी रक्त आवश्‍यक भासल्यास रक्तदात्यांना शोधण्याची वेळ येते. यामुळे ब्लड बॅंकेचे महत्त्व वाढले आहे. जिल्ह्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी, रेडक्रॉस रत्नागिरी व वालावलकर रुग्णालय डेरवण अशा तीनच रक्तपेढ्या आहेत. रेडक्रॉस आणि वालावलकर या दोन रक्तपेढ्या खासगी असून जिल्ह्यातील १४ लाख लोकसंख्येसाठी हे प्रमाण अपुरे आहे. 

चिपळूण व दापोली येथे रक्त साठवण केंद्र कार्यान्वित होणार आहे. तर नजीकच्या काळात संगमेश्‍वर आणि राजापूर येथे रक्त साठवण केंद्राची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीकडून देण्यात आली.

जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या मानाने तीन रक्तपेढ्या हे प्रमाण अत्यल्प आहे. खासगी रक्तपेढ्या विविध कार्यक्रमाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेतात. रक्‍त विघटनासाठी अत्याधुनिक उपकरणे तिनही रक्तपेढीत आहेत. रक्त विघटनामध्ये नवीन बदल या रक्तपेढ्यांनी आत्मसात केल्याने कोकणातील रुग्णांसाठी या तीनही रक्तपेढ्या आधारवड ठरत आहेत. ज्यांना रक्ताची गरज आहे, त्यांनी १०४ क्रमांकाव्दारे संपर्क साधल्यास संबंधित रुग्णाला ४० किलोमीटरपर्यंत जाऊन सरकारी रक्तपेढीव्दारे रक्त दिले जाते. अगदी माफक दरात ही सेवा मिळते. सरकारी ब्लड बॅंकामध्ये ४५० रुपये एका बॅगेची किंमत आहे. एकाने रक्तदाना केल्यास त्याच्या बदली रक्ताची बॅग देण्याची सोय उपलब्ध आहे. दारिद्य्ररेषेखालील कुटुंबाला मोफत रक्त देण्याची सोय शासनाने उपलब्ध केली आहे. सरकारी ब्लड बॅंका गरोदर महिला, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, कॅन्सरग्रस्त रुग्ण, बोनमॅरो, भाजलेला रुग्ण, नवजात बालक, कैदी, राजीव गांधी आरोग्यादायी योजना, एडस्‌, मलेरिया, टी. बी. आदींसाठी मोफत रक्त देतात.  

जिल्ह्यामध्ये तीन रक्ततपेढ्या असल्या तरी जिल्ह्यातील रुग्णांना पुरेल इतके रक्त जिल्ह्यात मिळू शकते. रक्त अन्य जिल्ह्यातून आयात करावे लागत नाही. पण सर्वांना पुरेसे आणि तातडीने रक्त मिळण्यासाठी ठिकठिकाणी ग्रामीण रुग्णालयात रक्त साठवण केंद्र उभारली जातील. 
- डॉ. पराग पाथरे, रक्त संक्रमण अधिकारी, जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी

Web Title: savarde konkan news 3 bloodbank for 14 lakh population