गणेशखिंड-सावर्डे रस्त्याचे भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

सावर्डे : जिल्ह्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा देणे आमचे कर्तव्य आहे. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही प्रामाणिकपणे काम करीत आहोत. मुख्यमंत्र्यांकडे जिल्ह्याच्या विकासासाठी दर वर्षाला एक हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. त्याप्रमाणे 890 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला मिळाले असून त्यामधूनच सावर्डे, मुर्तवडे, खोडदे, आंबवली हा 43 किमी रस्त्याला मंजुरी मिळाल्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितले.

गणेशखिंड- सावर्डे- दुर्गवाडी- तळवडे रस्ता कामाचे भूमिपूजन श्री. वायकर यांच्या हस्ते झाले. सावर्डे (ता. चिपळूण) येथील दुर्गेवाडी फाट्यावर हा कार्यक्रम झाला.

या वेळी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, बाळकृष्ण जाधव, शरद शिगवण, प्रकाश पंडित, युवराज राजेशिर्के, सागर सावंत, सुशील सावंत, नायशी सरपंच किशोर घाग, तालुकाप्रमुख सुधीर शिंदे, सुभाष गुरव आदी उपस्थित होते. गणेशखिंड, दुर्गवाडी, तळवडे या दरम्यान चार पॅचवर्कसाठी 87 लाख रुपये देण्यात आले.

Web Title: savarde road foundation stone