पर्यावरण वाचवा सांगणारी देवरुखमधील स्टील पाईपची गुढी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

झुम ग्राफिक्सचे सन्मुख कोळेकर यांनी यावर्षी गुढीसाथी चिवा न तोडता चक्क स्टिल पाईप वापरुन गुढी उभी करुन संस्कृतीही जपली व पर्यावरणही.

साडवली - होळीसाठी झाडे तोडली जातात तर गुढीसाठी चिवा (बांबू) तोडला जातो.यामुळे निसर्गसंपदचा र्‍हास होतो हे पाहून देवरुख मधील युवा व्यावसायिक सन्मुख कोळेकर यांनी गुढीसाठी चिवा न वापरता चक्क स्टिलचा पाईप वापरला. होळीसाठी झाडे तोडली जातातत्या बदल्यात नविन झाडे लावली जात नाहीत यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो.तसेच गुढी उभारण्यासाठी चांगला उंच चिवा तोडला जातो. हा प्रकार टाळण्यासाठी झुम ग्राफिक्सचे सन्मुख कोळेकर यांनी यावर्षी गुढीसाथी चिवा न तोडता चक्क स्टिल पाईप वापरुन गुढी उभी करुन संस्कृतीही जपली व पर्यावरणही. या कृतीशील संदेशाने नागरीकांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती नक्कीच निर्माणा झाली असेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Web Title: save environment steel pipe devrukh sadavali kokan